मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - मांस सोडून मगरीने तरुणावरच केला खतरनाक हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं भयानक दृश्य

VIDEO - मांस सोडून मगरीने तरुणावरच केला खतरनाक हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं भयानक दृश्य

स्वतःच्या हाताने मगरीला खायला देणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

स्वतःच्या हाताने मगरीला खायला देणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

स्वतःच्या हाताने मगरीला खायला देणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

  मुंबई, 08 फेब्रुवारी : मगरीच्या समोर जाण्याची हिंमतही कुणी करणार नाही. अशा मगरीच्या जवळ जाऊन स्वतःच्या हाताने खायला घालायला सांगितलं तर... तुम्हाला तर फक्त कल्पना करूनच घाम फुटला. पण एका तरुणाने ते प्रत्यक्षात केलं. मगरीजवळ जात त्याने तिच्यासमोर मांसाचा तुकडा धरला. पण मांस सोडून मगरीने तरुणावरच खतरनाक हल्ला केला (Crocodile attack on man viral video). मगरीने तरुणावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याचं नाव रॉबर्ट इरविन असं आहे (Crocodile attack robert irwin video) . जो एक पर्यावरणवादी आहे. त्याची आई स्टिव्ह इरविन जिचा स्टिंग रेची शिकार झाली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. 18 वर्षांचा रॉबर्टही आपल्या आईप्रमाणेच बनला आहे. त्याला अशा प्राण्यांची बिलकुल घाबरत नाही. त्याला मगरी पकडायला खूप आवडतं. अशाच एका मगरीशी त्याचा सामना झाला आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला धडकी भरेल. ऑस्ट्रेलिया जूच्या एका नव्या शोच्या एका एपिसोडचा हा व्हिडीओ आहे. स्टिव्ह या व्हिडीओत त्या मगरीची माहितीही देतो. या मगरीचं नाव कॅस्पर आहे. ती खूप रागिष्ट आणि भयंकर आहे. कॅस्पर कुणआवरही हल्ला करू शकते. हे वाचा - ...अन् चक्क कुत्र्यासमोर बिबट्यानेही घेतली माघार; VIDEO पाहून व्हाल अवाक व्हिडीओत पाहू शकता एका कुंपणाच्या आत एक छोटंसं तलाव आहे. त्यात ही मगर आहे. रॉबर्ट आधी त्या मगरीला पाहतो. पूर्ण तयारीनिशी तो आत जायचं ठरवतो. हातात एक मांस घेतो आणि तो हळूहळू करत आत जातो. रॉबर्ट जसा आत जातो तशी मगस त्याला पाहते. जसा रॉबर्ट चालतो त्याच दिशेने मगरही आत पाण्यात पोहोताना दिसते.
  रॉबर्ट थेट मगरीसमोर जाऊन उभा राहतो आणि हातात मांस धरून तिला बोलावतो. मगर पाण्याच्या किनाऱ्यावर येते आणि हल्ला करते. त्यानंतर ती पाण्यातून पूर्णपणे बाहेर येते. तसा रॉबर्ट आपल्या हातातील मांसाचा तुकडा तिच्याकडे फेकतो. मांस घेऊन मगर पुन्हा पाण्यात जाईल असं रॉबर्टला वाटतं. पण तसं बिलकुल होत नाही.  मगर त्या मांसाकडे पाहतही नाही. उलट ती मांस सोडून ती रॉबर्टचाच पाठलाग करते. हे वाचा - अचानक पर्यटकांच्या गाडीच्या जवळ आला सिंह अन्....; धडकी भरवणारा VIDEO रॉबर्ट मगरीपासून आपला जीव वाचवण्यासाठी पुढे पळतो. तशी मगरही त्याच्या मागे धावते. हा व्हिडीओ पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Viral, Viral videos

  पुढील बातम्या