मथुरा, 13 ऑक्टोबर : योगगुरु रामदेव बाबा हत्तीवर योगा अभ्यास करताना खाली पडल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातात त्यांना कुठेही दुखापत झालेली नाही, मात्र याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोमवारचा असल्याचे सांगितले जात आहे. मथुरामध्ये रमणरेती येथे बाबा रामदेव संतांना योगाभ्यास शिकवित होते. यावेळी मंचावर गुरु शरणानंद महाराज यांनीही योग केला.
यादरम्यान एका हत्तीवर बसून बाबा रामदेव योगाचे आसन शिकवित होते. त्यांचा हा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साधारण 22 सेकंदांचा आहे. ज्यामध्ये बाबा हत्तीवर बसून योगाचं आसन करीत आहे. मात्र अचानक हत्ती हलू लागतो. त्यामुळे रामदेव बाबांचं संतुलन बिघडलं आणि ते खाली पडले. मात्र सुदैवाने यामध्ये त्यांना दुखापत झाली नाही. मात्र ते पडल्यानंतर आजूबाजूला हसण्याचा आवाज व्हिडीओमधून ऐकू येत आहे.
हे ही वाचा-मंदिरात केला लग्नसोहळा; तब्बल 500 भटक्या कुत्र्यांसह नवदाम्पत्याच प्रीतीभोजन
Yoga Guru Baba Ramdev couldn't Perform Elephant-asana, he fell down pic.twitter.com/KfHBXv2a8f
— Mihir Jha ✍️ (@MihirkJha) October 13, 2020
या कार्यक्रमात बाबा रामदेवांनी या आसनांमुळे होणाऱ्या लाभांबाबत संतांना माहिती दिली. यावेळी त्यांना अनुलोम-विलोम व अन्य योगांविषयी माहिती दिली. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, योग केल्याने कठीणातील कठीण आजार नाहीसे होतात. लोकांना दररोज सकाळी किंवा सायंकाळी योग करायला हवं. शरणानंद महाराजांनी सांगितले की, भारतात प्राचीन काळापासून लोक योग करीत आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.