मराठी बातम्या /बातम्या /देश /मंदिरात केला छोटेखानी लग्नसोहळा; तब्बल 500 भटक्या कुत्र्यांसह नवदाम्पत्याच प्रीतीभोजन

मंदिरात केला छोटेखानी लग्नसोहळा; तब्बल 500 भटक्या कुत्र्यांसह नवदाम्पत्याच प्रीतीभोजन

ऐरवी लग्नात नवरा-नवरीभोवती मित्र-मंडळी आणि नातेवाईकांचा गराडा असतो, इथे मात्र परिस्थिती वेगळीत होती

ऐरवी लग्नात नवरा-नवरीभोवती मित्र-मंडळी आणि नातेवाईकांचा गराडा असतो, इथे मात्र परिस्थिती वेगळीत होती

ऐरवी लग्नात नवरा-नवरीभोवती मित्र-मंडळी आणि नातेवाईकांचा गराडा असतो, इथे मात्र परिस्थिती वेगळीत होती

ओडिशा, 13 ऑक्टोबर : लग्नानंतर मित्रपरिवार आणि नातेवाईकांना लग्नांला बोलवलं जातं. याला रिसेप्शन म्हटलं जातं. यावेळी मित्र-नातेवाईक आनंदाना लग्नात सहभागी होतात. मात्र ओडिशामध्ये (Odisha) एका दाम्पत्याने लग्नाच्या दिवशी काही तरी वेगळं करण्याचं ठरवलं. जेव्हा 25 सप्टेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये (Bhubaneswar) यूरेका आप्टा (Eureka Apta) आणि जोआना वांग यांनी (Joanna Wang) लग्न केलं. त्यांनी शहरातील साधारण 500 भटक्या कुत्र्यांसाठी (Couple Feed 500 Stray Dogs On Wedding Day) विशेष भोजनाची व्यवस्था केली.

यूरेका आप्टा पायलट आणि चित्रपट निर्माता आहे. तर जोआना वांग एक दंत चिकित्सक आहे. लग्नाच्या दिवशी दाम्पत्याने भुवनेश्वरमध्ये 500 हून अधिक भटक्या कुत्र्यांना जेवू घालण्यासाठी स्थानिक पशू बचाव संघटनेसोबत करार केला. 25 सप्टेंबर रोजी जेव्हा या जोडीचं लग्न झालं तेव्हा पशू कल्याण ट्रस्ट एकमराच्या (AWTE) स्वयंसेवकांनी त्यांच्याकडून भटक्या कुत्र्यांना जेवण दिलं.

हे ही वाचा-गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च; मोबाईल राहणार रेडिएशन फ्री

आप्टाने सांगितले, 'लॉकडाउनमध्ये आमचा एक मित्र सुकन्या पतिने अपघात झालेल्या एका भटक्या कुत्र्याला वाचवलं होतं. मी जोआनासोबत भटक्या कुत्र्यांवर उपचार करवून घेतले होते. त्यानंतर आम्ही त्याला एनिमल वेलफेयर ट्रस्ट एकमरा या डॉल शेल्टरमध्ये (AWTE) घेऊन गेलो.  ते म्हणाले की, आम्हाला डॉग शेल्टर होममध्ये जाऊन खूप बरं वाटलं. तेथे कुत्रे आनंदात खेळत होते, तेथे त्यांची काळजी घेतली जात होती. पुढे आप्टा म्हणाली की, तीन वर्षांच्या नातेसंबंधानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं व कुत्र्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा विचार केला. दाम्पत्याने शेल्टर होमसाठी भोजन आणि औषधं खरेदी केली आणि AWTE चे संस्थापक पूरबी पात्रा यांच्या मदतीने शहरात एक व्यापक अभियान सुरू केलं, ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांना मदत मिळू शकेल.

First published:
top videos

    Tags: Marriage