जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : डोंगराळ रस्ता पार करताना गाडी खाली कोसळली अन्... भयानक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video : डोंगराळ रस्ता पार करताना गाडी खाली कोसळली अन्... भयानक घटना कॅमेऱ्यात कैद

दुचाकीस्वारासोबत घडलं भयानक

दुचाकीस्वारासोबत घडलं भयानक

अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. रस्त्यावर, डोंगरावर फिरायला गेल्यावर अशा विविध ठिकाणी अपघात होत असतात. अशा घटनांचे व्हिडीओदेखील अनेकवेळा सोशल मीडियावर फिरत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 मे : अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. रस्त्यावर, डोंगरावर फिरायला गेल्यावर अशा विविध ठिकाणी अपघात होत असतात. अशा घटनांचे व्हिडीओदेखील अनेकवेळा सोशल मीडियावर फिरत असतात. अनेक धक्कादायक, अंगावर काटा आणणारे हे अपघात असतात. असाच एक धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये डोंगराळ रस्ता पार करताना गाडी खाली कोसळली. व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार आपली बाईक एका उंच टेकडीवरून अरुंद वाटेने नेताना दिसतोय. दुसरीकडे खोल जंगल दिसत आहे. छोटा रस्ता असल्यामुळे दुचाकीस्वार एकदम हळूहळू गाडी पुढे नेत आहे. मात्र ज्याची भिती तेच घडतं आणि दुचाकीस्वार गाडीसह खाली कोसळतो. गाडी खाली खोल खड्ड्यात पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे चालक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. हा भयंकर अपघात पाहून अंगावर काटा उभा राहतोय. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 21 सेकंदाच्या या थरारक व्हिडीओवर अनेक कमेंट येताना पहायला मिळतायेत. या व्हिडीओला नेटकरी एकापेक्षा अधिक वेळा पाहत आहेत.

जाहिरात

दरम्यान, असे धाडसी स्टंट करुन लोक प्रसिद्ध होण्यचा प्रयत्न करतात. मात्र ही गोष्ट त्यांच्याच अंगावर येते आणि काहीतरी भयानक घडतं. त्यामुळे कोणत्याही सेफ्टीशिवाय असा जीवघेणा स्टंट करणं धोक्याचं आहे. तरी वारंवार असे स्टंट करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात