मुंबई, 28 ऑक्टोबर- ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित विविध फोटो, पेटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्युजनमधली विशिष्ट गोष्ट काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सला दिलं जातं. त्यामध्ये कधी एखादी वस्तू दडलेली असते, तर कधी एखादा प्राणी. अनेकवेळा फोटोतील ती विशिष्ट गोष्ट आपल्याला लवकर सापडत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक चित्र घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अशी छत्री शोधायची आहे, जिचा कोणीही मालक नाही, म्हणजेच ती छत्री कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसून रस्त्यावर बेवारस पडली आहे. व्हायरल होत असलेल्या चित्रात शहरातील एक रस्ता दिसत आहे. पाऊस सुरू असल्यामुळे लोक छत्री घेऊन रस्त्यावरून जाताना दिसतात; पण या चित्रामध्ये अशी एक छत्री आहे, जी बेवारस पडून आहे. तुम्हाला ही बेवारस छत्री अवघ्या 7 सेकंदांत शोधून काढायची आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल, तरच तुम्ही हे आव्हान पूर्ण करू शकाल. **(हे वाचा:** Optical Illusion: फोटोत लपलेल्या सापाला 17 सेकंदात ओळखून दाखवणारे ठरतील बुद्धिमान: कोण घेणार चॅलेंज ) चित्रामध्ये नेमकं आहे काय? व्हायरल होत असलेल्या चित्रामध्ये पावसाळ्याचं दृश्य आहे. शहरातील एक रहदारीचा रस्ता दिसत असून, पाऊस सुरू असल्यामुळे या रस्त्यावर छत्री घेऊन काही लोक उभे असल्याचं दिसतं. मात्र, हे चित्र तयार करणाऱ्या कलाकारानं हुशारीनं यात एक छत्री अशी लपवली आहे, जी कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसून, बेवारस पडून आहे. ही बेवारस पडलेली छत्रीच तुम्हाला 7 सेकंदांत शोधून काढायची आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर तुम्ही हे आव्हान 7 सेकंदांपेक्षा कमी वेळात पूर्ण कराल.
कुठे आहे बंद छत्री? ब्राइट साइड या सोशल मीडिया अकाउंटवरून हे चित्र शेअर केलं गेलंय. या चित्रातील बेवारस असणारी छत्री तुम्हाला दिसली असेल. मात्र, तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही तुम्हाला ती दिसली नसेल, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला त्यासाठी एक हिंट देत आहोत. या फोटोच्या डाव्या बाजूला तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, तर तुम्हाला एक बेवारस पडलेली छत्री दिसेल. तुम्ही जर ही छत्री 7 सेकंदांपेक्षा कमी वेळात शोधून काढली असेल, तर तुम्हीही जिनिअस लोकांच्या यादीत सामील झाला आहात.
दरम्यान, ऑप्टिकल इल्युजनचा उपयोग एखाद्या व्यक्तीची एकाग्रता, बुद्धिमत्ता आदी गोष्टींची पारख करण्यासाठी होतो. सोशल मीडियावर सध्या हा प्रकार खूपच चर्चेत आहे. आतापर्यंत अशी अनेक ऑप्टिकल इल्युजन्स नेटिझन्ससाठी आव्हान ठरली आहेत. अनेकांना हे आव्हान स्वीकारण्यास खूप आवडतं.