मुंबई, 22 ऑक्टोबर- अलीकडे सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे विविध फोटो, पेंटिंग्ग व्हायरल होतात. या ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रामधली विशिष्ट गोष्ट काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सना दिलं जातं. त्यामध्ये कधी एखादी वस्तू दडलेली असते, तर कधी एखादा प्राणी. अवघ्या काही सेकंदांत ती वस्तू, प्राणी शोधण्याचं आव्हान दिलं जातं. आतापर्यंत अशी अनेक चित्रं किंवा फोटो नेटिझन्ससाठी आव्हान ठरली आहेत. नुकताच सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला असून, ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये लपलेला साप 17 सेकंदांत शोधण्याचं आव्हान देण्यात आलंय. एखाद्या ऑप्टिकल इल्युजनचं चॅलेंज सोडवण्याचा प्रयत्न नेटिझन्स मन लावून करतात. अलीकडेच एक फोटो व्हायरल झाला असून त्यात लपलेला साप 17 सेकंदांत शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. अनेकांनी हे आव्हान स्वीकारून फोटोत दडलेल्या सापाला शोधण्याचा प्रयत्न केला. हे काम करताना अनेकांची बुद्धी पणाला लागली; मात्र उत्तर काही मिळालं नाही. **(हे वाचा:** फोटोत दडलेल्या माणसाला 11 सेकंदांत शोधणारे ठरतील ‘सुपर जीनिअस’, नेमकं काय आहे प्रकरण? ) बर्याच जणांनी सांगितलं, की ‘ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोचं चॅलेंज खूप कठीण आहे आणि यातला साप शोधण्यात अपयश येतं;’ पण काही जणांना या फोटोतला साप शोधण्यात यशही आलंय. आपणही ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो काळजीपूर्वक पहा, आणि त्यात साप दिसतोय का, हे शोधा. तो शोधण्यासाठी तुम्हाला केवळ तीक्ष्ण नजरच नाही, तर तीक्ष्ण बुद्धीसुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्हीही हे ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवण्यात यशस्वी झालात, तर तुम्हीही जीनिअस व्यक्तींच्या यादीत सहभागी व्हाल.
कुठं लपलाय साप? तुम्हालाही या फोटोमध्ये लपलेला साप दिसत नसेल, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देत आहोत. या फोटोमध्ये एका कोपऱ्यात दोन उंच झाडं शेजारीशेजारी असून त्यामधल्या एका झाडाच्या सर्वांत वरच्या टोकावर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला तेथे साप दिसेल. एखाद्या व्यक्तीची एकाग्रता, बुद्धिमत्ता, मानसिक क्षमता आदी गोष्टींची पारख करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचा उपयोग होता. सोशल मीडियावर सध्या हा प्रकार खूपच चर्चेत आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीनं ऑप्टिकल इल्युजनचं आकलन होत असतं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात लपलेले खास गुण जाणून घेण्याकरिताही अशा इल्युजनचा चाचणी म्हणून वापर होतो. त्याचप्रमाणे तुमची आकलनशक्ती, मानसिक क्षमता, एकाग्रता आदी गोष्टींविषयी माहिती इल्युजनच्या माध्यमातून मिळते.