मुंबई, 09 फेब्रुवारी : कदाचित असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या फोनमध्ये व्हॉट्सऍप नसेल. कारण मेसेज तसेच फोटो, लोकेशन, व्हिडीओ शेअर करण्यासाठी प्रत्येक लोक व्हॉट्सऍपचा वापर करतो. हे वापरणे फारच सोप्पं आहे. इतकच काय तर आता ऑफिसची देखील अनेक काम व्हॉट्सऍपवरच होतात. व्हॉट्सऍप देखील आपल्या युजर्सला चांगल्या सोयी देण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे नेहमीच व्हॉट्सऍपमध्ये काहीना काही बदल होत असतात. आपण देखील नेहमीच व्हॉट्सऍप वापरत असलो, तरी देखील आपल्याला त्यातील अनेक गोष्टी माहित नसतात.
अनेकांना बऱ्याचदा असं वाटत असतं की त्यांना ऑनलाईन न जाता व्हॉट्सऍपवरील मॅसेज वाचता आले असते तर बरं झालं असतं. त्यासाठी अनेक लोक आपला लास्ट व्ह्यू हाईड करतात. पण असं असलं तरी तुमचं ऑनलाईन स्टेटस मात्र तुम्ही लपवू शकत नाही. मग अशा वेळेस मात्र पंचायत होते.
हे ही वाचा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय
पण काळजी करु नका, आम्ही तुमच्यासाठी अशा ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही ऑनलाईन न दिसता पण मेसेज वाचू शकता.
अर्थात, तुम्ही तुमचे WhatsApp मेसेज नोटीफिकेशन पॅनेलमध्ये वाचू शकता, परंतु यावरुन तुम्ही मोठे किंवा लांब मेसेज संपूर्ण वाचू शकत नाही. मग ते कसे वाचायचे चला पाहू.
WhatsApp युक्ती : how to open whatsapp message without seen
ही युक्ती अगदी सोपी आहे आणि सेट करण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो.
Step 1: Android फोन वापरकर्त्यांनी प्रथम तुमच्या ब्लॅंग डिस्प्लेवर जा आणि लाँग प्रेस करा
Step 2: तिथे तुम्हा 3/4 ऑप्शन्स दिसतील, त्यापैकी विजेट्सवर टॅप करा (widgets) आणि तुम्हाला स्मार्टफोन स्क्रीनवर सर्व विजेट्स दिसतील.
Step 3: आता येथे WhatsApp विजेट ( widgets) शोधा.
Step 4: फक्त WhatsApp विजेटवर टॅप करा आणि ते तुमच्या होमपेजवर जोडले जाईल. त्यानंतर तुम्ही विजेटवर जास्त वेळ दाबून ठेवू शकता आणि जोपर्यंत तुम्हाला स्वच्छ होमपेज स्क्रीन इंटरफेस मिळत नाही तोपर्यंत उजवीकडे ड्रॅग करू शकता.
Step 5: त्यानंतर ओकेवर टॅप करा. विजेटवर दीर्घकाळ दाबा आणि त्याला वरच्या बाजूला हलवा. मग तुम्हाला विजेटचा विस्तार करण्याचा पर्याय मिळेल, तुम्ही ते फुल स्क्रीनवर करुन देखील पाहू शकता. यामुळे संपूर्ण संदेश वाचणे सोपे होईल.
ऍप न उघडता सर्व whatsapp मेसेज कसे वाचायचे
एकदा तुम्ही कोणत्याही एका होमपेजवर WhatsApp विजेट यशस्वीरित्या सेट केल्यानंतर, तुम्हाला सर्व संदेश वाचण्यासाठी खाली स्क्रोल करावे लागेल. App मधील चॅटनुसार संदेश वर खाली होतो. त्यामध्ये सर्वात रिसेंट किंवा नवीन आलेला मेसेज तुम्हाला शीर्षस्थानी दिसेल आता तुम्ही त्याला स्क्रोल करुन वाचू शकता.
काय लक्षात ठेवावे
तुम्हाला एखादा मेसेज गुप्तपणे वाचायचा असल्यास, विजेटमधील कोणत्याही संदेशावर तुम्हाला टॅप करायचा नाहीय. तुम्ही टॅप करताच तुम्ही त्या स्क्रिन किंवा मेसेजवर जाल. टॅप केल्यावर, व्हॉट्सअॅपवर चॅट उघडेल आणि प्लॅटफॉर्मवर दिसून येईल की तुम्ही संदेश वाचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Top trending, Viral, Whatsapp