Home /News /viral /

आंघोळ करताना करीत होता WhatsApp चॅट; अनेकांना आठवले ते दिवस...; PHOTO तुफान व्हायरल

आंघोळ करताना करीत होता WhatsApp चॅट; अनेकांना आठवले ते दिवस...; PHOTO तुफान व्हायरल

हा फोटो तुफान व्हायरल झाला असून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.

    सतत बोलत राहायलं हवं, संवाद साधत राहायला हवा. अन्यथा आयुष्यात एक शांत पोकळी निर्माण होईल, असं म्हणतात. म्हणजे जीवघेणी शांतता. त्यामुळे गप्पा, चॅट करीत राहायला हवं. संवाद साधल्याने नातं अधिक घट्ट होतं असं म्हटलं जातं. मात्र यासाठी समोरची व्यक्तीही तशीच लागले. अनेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलताना वेळेचं व जागेचं भानच राहत नाही. असं वाटतं गप्पा सुरूच राहाव्यात. (WhatsApp chat was doing while bathing PHOTO goes Viral) सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत ही व्यक्ती शॉवर घेत असताना व्हॉट्सअपवर चॅट करीत आहे. हे ही वाचा-वृत्तपत्रात छापलेला BF सोबतचा एक फोटो ठरला टर्निंग पॉईंट; IAS चांदनीचा किस्सा हा फोटो ट्वीटर युजर @unhappykiddd ने शेअर केला आहे. याशिवाय फोटोला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, जेव्हा संवाद मजेशीर असेल... या फोटोला हजारोंमध्ये लाइक्स मिळत आहे. शिवाय री-ट्विट केलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तर प्रेमाचे सुरुवातीचे दिवस अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bathroom, Photo viral, Showered, Social media, Whatsapp chat

    पुढील बातम्या