Home /News /viral /

प्रेमात पडल्यावर कशी बदलते व्यक्ती; हा एक PHOTO उलगडेल गुपित

प्रेमात पडल्यावर कशी बदलते व्यक्ती; हा एक PHOTO उलगडेल गुपित

प्रेमात पडून एखादी व्यक्तीमध्ये काय आणि किती बदललं आहे, हे या फोटोवरून समजेल.

    मुंबई, 17 मे : एखादी व्यक्ती विचित्र वागू लागली, आपल्याच विश्वात रमू लागली की तू प्रेमात वगैरे पडलास/पडलीस का असं आपण मजेत विचारतो. प्रेमात पडल्यावर व्यक्ती बदलते असं म्हटलं जातं. प्रेमात व्यक्ती काय काय नाही करत (Social media viral photo). याची बरीच उदाहरणंही तुम्हाला माहिती असतील. पण प्रेमात पडल्यावर व्यक्ती बदलते म्हणजे नेमकं काय? किंवा ज्या व्यक्तीत नेमका काय बदल होतो? हे एका फोटोतून तुम्हाला समजेल (Optical illusion photo). सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. ऑप्टिकल इल्युजनवाला हा फोटो आहे. ज्यात प्रेमात पडून एखादी व्यक्तीमध्ये काय आणि किती बदललं आहे, हे समजेल. प्रेमात पडलेल्या व्यक्तीची पर्सनालिटी या फोटोवरून समजेल.  ओमेग सुप्लियाक यांच्या पेंटिंग कलेक्शनमधील हा फोटो आहे. यात एक झाड, त्याच्याशेजारी एक महिला, एक मिशीवाली आणि बिना मिशीची व्यक्ती यांचा समावेश आहे. तसंच यामध्ये एक घर आणि एक यंत्रही दिसत आहे. हे वाचा - किचनमध्ये अचानक लागली आग, महिला विझवायला गेली पण शेवटी...; थरकाप उडवणारा LIVE VIDEO योर टँगोच्या रेबेका स्टोक्स यांच्या मते, जेव्हा तुम्ही प्रेमात नसला तेव्हा तुम्ही आपला वेळ त्या प्रत्येक व्यक्ती जाणून घेण्यात लावता जिला तुम्ही भेटता. त्यांच्या मते,  या फोटोत ज्यांना मिशीवाली व्यक्ती पहिली दिसली ते कुणाच्याही प्रेमात पडतात. प्रेमात पडणं म्हणजे जीवनाला केंद्रात आणण्यासारखं असतं. जे कुटुंब आणि घराच्या महत्त्वाबाबत जागरूक करतं. ज्या लोकांना मिशी नसलेला पुरुष पहिला दिसला ते लोक नातं जोडताना अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर आणि आत्मनिरीक्षण करणारे होतात. ज्या लोकांना झाडाशेजारील महिला पहिली दिसली त्यांना प्रत्येक गोष्टीत कामुकता दिसते. जर तुम्हाला यात घर सर्वात आधी दिसलं तर याचा अर्थ तुम्ही आयुष्यात पुढील 10 वर्षांची योजना घेऊन चालला आहात. जर या फोटोत सर्वात आधी यंत्र दिसलं तर अशा व्यक्ती अधिक रचनात्मक होतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Love, Photo, Viral, Viral photo

    पुढील बातम्या