मुंबई : कोणाला पत्र पाठवायचं असू देत किंवा मग ऑनलाईन डिलिव्हरी मागवायची असू देत एक गोष्ट महत्वाची असते जी आवर्जुन टाकावी लागते ती म्हणजे पीन कोड. जो तुमच्या स्थानिक एरियाशी संबंधीत असतो. तसे पाहाता आता टपाल सेवा किंवा पत्र हा प्रकार राहिलेला नाही. लोकांनी काहीही बोलायचं असलं तरी लोक मेसेजवर एकमेकांशी बोलतात. पण असं असलं तरी टपालसाठी महत्वाचा असलेला पिन कोड आजही वेगवेगळ्या कारणासाठी कामाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ऑनलाई डिलिव्हरी. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा पिन कोड देखील माहित असणे आवश्यक आहे. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? पण तुम्ही कधी विचार केलाय का की, कोणत्याही ठिकाणचा पिन कोड कसा ठरवला जातो आणि त्यातील आकड्यांचा अर्थ काय असतो? चला याबद्दल एक गोष्ट जाणून घेऊ. पिनकोडचा फुलफॉर्म ‘पोस्टल इंडेक्स नंबर कोड’ आहे. याची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 रोजी झाली. भारतात पिन कोडमध्ये एकूण 6 क्रमांक आहेत. यातील प्रत्येक क्रमांकाचा विशिष्ट अर्थ आहे जो संबंधित क्षेत्र, जिल्हा आणि पोस्ट ऑफिसशी संबंधित आहे. त्या ठिकाणचे क्षेत्रफळ पहिल्या अंकाद्वारे दर्शविले जाते. विशेष म्हणजे, भारतात एकूण 9 पिन क्षेत्रे आहेत. या 9 पिन फील्डपैकी प्रारंभिक 8 सामान्य भौगोलिक स्थानाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहेत, तर नववा अंक (9) हा आर्मी पोस्टल सेवेसाठी वापरला जातो. उप-प्रदेश पिन कोडच्या दुसऱ्या अंकाद्वारे दर्शविला जातो. तर तिसरा अंक हा पहिल्या दोन संख्यांचा मिळवून क्षेत्राचे विशिष्ट वर्तुळ ओळखतात.
पिनकोडचे शेवटचे तीन अंक जिल्ह्यातील विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात. अशा प्रकारे तुमचे पत्र किंवा पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचतो. पिन कोड खूप वापरला जातो. सरकारी कार्यालयांपासून ते वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत त्याचा वापर केला जातो ज्याद्वारे आपल्या क्षेत्राची ओळख होते.