दरम्यान वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून याच तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळं तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्याशिवाय 20 गावांचा संपर्क तुटला आहे. वडगाव - पिंपळगाव मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. सायगव्हान, सावंगी, लोखंडी, पिंपळगाव या गावाला पाण्याने वेढले आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.असा धोका पत्करू नका! पुराच्या पाण्यात वाहून जात असतानाही तरुण दुचाकी सोडेना, धक्कादायक VIDEO pic.twitter.com/O8glJSOMBW
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Wardha news