जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Weird Tradition : इथं 21 वर्षांची होताच तरुणींची व्हर्जिनिटी पार्टी; आईच लेकीचे कपडे काढते अन्...

Weird Tradition : इथं 21 वर्षांची होताच तरुणींची व्हर्जिनिटी पार्टी; आईच लेकीचे कपडे काढते अन्...

21 वर्षांत तरुणींची व्हर्जिनिटी पार्टी.

21 वर्षांत तरुणींची व्हर्जिनिटी पार्टी.

मुलगी व्हर्जिन असल्याचं सिद्ध झालं, तर तिचं कुटुंब मोठ्या समारंभाचं आयोजन करून आपला आनंद व्यक्त करतात.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

केपटाउन, 16 जून : प्रत्येक देशातल्या परंपरा, चालीरीती भिन्न असतात. काही परंपरा त्या प्रांताची, किंबहुना देशाची ओळख असतात. काही परंपरा अतिशय विचित्र असतात. काळ बदलला, पिढी बदलली तरी आजही अनेक प्रांतांमध्ये, देशांमध्ये अशा काही चाली-रीतींचं पालन केलं जातं. दक्षिण आफ्रिकेत आजही अनेक जुन्या परंपरा, चाली-रीती जपल्या गेल्या आहेत. यातल्या काही परंपरांनी तर जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आफ्रिकेतली अशीच एक परंपरा तिच्या वैचित्र्यामुळे जगाचं लक्ष वेधते. आफ्रिकेतल्या झुलू जमातीत उमेमुलो नावाची वेगळी परंपराआहे. या परंपरेनुसार, मुलीला आपलं कौमार्य किंवा व्हर्जिनिटी सिद्ध करावी लागते. मुलगी व्हर्जिन असल्याचं सिद्ध झालं, तर तिचे कुटुंबीय मोठ्या समारंभाचं आयोजन करून आपला आनंद व्यक्त करतात. दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू जमातीत लग्नापूर्वी सेक्स करणं अपवित्र मानलं जातं. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत मुलीनं व्हर्जिन राहणं अनिवार्य आहे; मात्र आता याबाबत महिलांचे विचार बदलत आहेत. अनेक महिला या प्रकाराला असमानतेचं प्रतीक मानतात. कारण पुरुषांसाठी अशी कोणतीही प्रथा या जमातीत अस्तित्वात नाही. त्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी नियम समान असावेत, असा विचार येथे आता मांडला जात आहे. Weird Tradition : आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात इथल्या महिला; कपडेही धूत नाहीत कारण… झुलू जमातीतली एखादी मुलगी जेव्हा 21 वर्षांची होते, तेव्हा तिचे कुटुंबीय व्हर्जिनिटी पार्टीचं आयोजन करतात. या वेळी या मुलीची व्हर्जिनिटी सेलिब्रेट केली जाते. उमेमुलो परंपरेत, एका झुलू मुलीला स्त्रीत्व प्राप्त झाल्याची आठवण करून दिली जाते. या परंपरेत मुलीने लग्नापूर्वी सेक्स न केल्याबद्दल आणि संस्कारांचं पालन केल्याबद्दल तिचा सन्मान केला जातो. आमची मुलगी 21 वर्षांची झाली असून ती अद्याप कुमारिका असल्याचं कुटुंबीय अभिमानाने सांगत आनंदोत्सव साजरा करतात. या वेळी मुलीला खूप भेटवस्तूही दिल्या जातात. मुलीचे कुटुंबीय आपल्या नातेवाइकांना या पार्टीसाठी आमंत्रित करतात. ही पार्टी सुरू होण्यापूर्वी मुलीच्या सन्मानार्थ जनावराचा बळी दिला जातो. या जनावराची कातडी सोलून मुलीला आपलं शरीर या कातड्यानं झाकून घ्यावं लागतं. व्हाइस इंडियातल्या एका लेखात थेंबला या झुलू जमातीच्या महिलेने लिहिलं आहे, ‘मलाही या परंपरेतून जावं लागलं. मी 21 वर्षांची होण्याच्या सहा महिने आधी माझ्या कुटुंबियांनी व्हर्जिनिटी पार्टीच्या आयोजनाची तयारी सुरू केली होती. मी व्हर्जिन आहे की नाही हे माझ्या आईने तपासलं. कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेनुसार मला टॉपलेस व्हायचं होतं. गायीचे फॅटी टिश्यू अंगावर परिधान करायचे होते. या समारंभादरम्यान हे टिश्यू फाटले, तर याचा अर्थ संबंधित मुलगी व्हर्जिनिटीबाबत खोटं बोलत असल्याचं मानलं जातं.’ Weird Tradition : इथं लग्नाआधी नवरदेव नवरीसाठी खरेदी करतो इनरविअर आणि लग्नातच… परंतु, हा प्रकार असमानता दर्शवणारा असल्याने प्रत्येक महिला आणि पुरुषांसाठी नियम समान असावेत, अशी मागणी या जमातीतली नवी पिढी करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात