जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घरातील ज्येष्ठांचा घेतला जातो जीव, भारतातील एका राज्यात होतं प्रथेचं पालन; वाचा सविस्तर

घरातील ज्येष्ठांचा घेतला जातो जीव, भारतातील एका राज्यात होतं प्रथेचं पालन; वाचा सविस्तर

घरातील ज्येष्ठांचा घेतला जातो जीव, भारतातील एका राज्यात होतं प्रथेचं पालन; वाचा सविस्तर

ज्येष्ठ नागरिकांना मारून टाकण्याची एक अनोखी प्रथा अजूनही तमिळनाडूच्या दक्षिण भागात पाळली जाते. या पद्धतीत वृद्ध व्यक्तींना थेट ठार करण्यात येतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 9 जानेवारी: घरातील ज्येष्ठ नागरिकांचा (Senior Citizens) जीव घेऊन (Killing) त्यांना ठार करण्याची प्रथा तमिळनाडू (Tamil Nadu) राज्याच्या दक्षिण भागात आजही प्रचिलत आहे. खरं तर भारतीय समाजात ज्येष्ठ नागरिकांना मानाचं स्थान दिलं जातं. त्यांची प्रत्येक कुटुंबाकडून काळजी घेतली जाते आणि त्यांच्या अखेरच्या काळात कमीत कमी त्रास व्हावा, याची तजवीज केली जाते. मात्र भारतात असा एक भाग आहे, जिथं ज्येष्ठ नागरिकांना जीवे मारलं जातं आणि एक समाज म्हणून या प्रथेचं पालन केलं जातं.   काय आहे प्रथा? तमिळनाडूत पूर्वीपासून पालन होणाऱ्या या प्रथेचं नाव आहे थलाईकुथल. ही प्रथा भयंकर आणि अमानवी असल्याचं मानलं जातं. मात्र ती वर्षानुवर्षं पाळली जाण्यामागे काही प्रॅक्टिकल कारणं असल्याचंही सांगण्यात येतं. कुटुंबातील असाध्य आजारानं ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीला मारण्यासाठीच या प्रथेचा वापर करण्यात येतो. सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना मारण्यासाठी याचा वापर होत नाही. मात्र ज्यांना असाध्य आजार झाला आहे, त्यांना मरणयातना सहन करत तडफडत ठेवण्याऐवजी ठार करून लवकर त्यांची सुटका करण्याची ही पद्धत आहे.   इच्छामरणासारखी प्रथा ही प्रथा काहीशी इच्छामरणासारखी असल्याचं या भागातील नागरिक सांगतात. ज्यांना असाध्य आजार झाला आहे आणि त्यातून बरे होण्याची कुठलीही शक्यता नाही, अशा नागरिकांना अनेकदा वेदना सहन करत बसण्याऐवजी मृत्यू पत्करणं सोपं असतं. असह्य वेदानांचा प्रवास करत मृत्यूपर्यंत पोहोचण्याऐवजी जर थेट मरण आलं, तर वेदना सहन करण्याची गरज कमी होते. याच विचारातून ही प्रथा निर्माण झाल्याचं मानलं जातं.   तीन प्रकारांनी देतात मरण थलाईकुथल पद्धतीत तीन प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना ठार करण्यात येतं.   हे वाचा -

पहिली पद्धत या पद्धतीत ज्येष्ठ नागरिकाला अंघोळ घातली जाते आणि त्याला लगेचच कच्च्या नारळाचं तेल पाजलं जातं. त्यानंतर तुळशीचा रस आणि दूथ देण्यात येतं. त्यामुळं माणसाच्या शरीराचं तापमान वाढून 92 ते 93 डिग्री फॅरेनहाईट होतं. त्यामुळे मरणासन्न व्यक्तीचा मृत्यू होतो.   दुसरी पद्धत मरणासन्न व्यक्तीला चकली किंवा तत्सम पदार्थ खाण्यासाठी देण्यात येतो. व्यक्ती आजारी असल्यामुळे हे पदार्थ त्या व्यक्तीच्या घशात अडकतात आणि तिचा मृत्यू होतो.   तिसरी पद्धत या पद्धतीनुसार पाण्यात माती मिसळून ती ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. त्यामुळे त्याचं पोट बिघडतं आणि मृत्यू होतो. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात