बीजिंग, 20 जुलै : देश आणि जगभरात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. त्यापैकी काही विचित्र आहेत. पण तुम्ही कधी भुतांचं लग्न ऐकलं आहे का? हो असं एक ठिकाण जिथं भुतांचीही लग्न होता. जिवंत माणसं भुतांचं लग्न लावून देतात. अगदी थाटात हे लग्न होतं. आता भुतांचं हे लग्न होतं तरी कसं आणि का, ते पाहुयात. भूत आहेत नाहीत हे माहिती नाहीत. यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. पण मग भुतांचं लग्न नेमकं लागतं तरी कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता तर आता प्रत्येकाला असेल. भुतांचं लग्न लावण्याची अजब परंपरा आहे ती चीनमधील. गेल्या ३ हजार वर्षांपासून तिथं ही प्रथा सुरू आहे. लग्नात झाला गडबड घोटाळा! एक चूक आणि नवरदेवाच्या वडिलांसोबत नवरीचं लग्न एरवी जसं लग्न होतं, तसंच या भुतांचंही लग्न होतं. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधला जातो. या लग्नात वय आणि कौटुंबिक पार्श्वभूमीही महत्त्वाची असते. यासाठी मॅच मेकर म्हणून फेंगशुई मास्टर्सना ठेवलं जातं. जे लग्नासाठी योग्य कुटुंब शोधून देतात. नवरीचं कुटुंब हुंडा घेतं. यात दागिने, नोकर आणि हवेलीचा समावेश असतो. ही संपूर्ण प्रक्रिया कागदावर श्रद्धांजलीच्या रूपात होते. लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचे अंत्यसंस्कार विधी केले जातात आणि जेवण घातलं जातं. नवरीची कबर खोदून तिच्या हाडांचा सापळा नवरदेवाच्या कबरीत टाकला जातो. Viral News : इथे लग्न फक्त एका दिवसासाठी होतं, कारण थक्क करणारं या प्रथेमागील मान्यताही वेगवेगळ्या आहेत. जर कुणाचं जिवंतपणी लग्न झालं नाही तर मृत्यूनंतर त्यांनी लग्न करणं गरजेचं आहे. मृत्यूनंतरही मृतांनी आपलं आयुष्य सुरू ठेवावं अशी यामागील धारणा आहे. काहींच्या मते, जर मृतांची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यांच्यावर दुर्भाग्य कोसळतं. तर काहींच्या मते, भुतांचं लग्न लावून दिल्याने मृतांना शांती मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.