जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Weird Tradition : अरेंज, लव्ह नव्हे तर किडनॅप मॅरेज; इथं तरुणीचं अपहरण करून लग्न करण्याची प्रथा

Weird Tradition : अरेंज, लव्ह नव्हे तर किडनॅप मॅरेज; इथं तरुणीचं अपहरण करून लग्न करण्याची प्रथा

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

मुलीला किडनॅप करून लग्न करणं हा एक अरेंज मॅरेजचाच प्रकार आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

जकार्ता, 22 जुलै : मुला-मुलींचं प्रेम जुळलं आणि कुटुंबाने लग्नाला विरोध केल्याने जोडप्याने पळून केलेलं लग्न किंवा मुलाचं प्रेम एकतर्फी असेल तर मुलाने मुलीला जबरदस्ती पळवून नेल्याचं घटना आपण आजवर ऐकल्यात. मात्र मुलाने मुलीला पळवून नेऊनच लग्न करण्याची प्रथा आहे, असं सांगितलं तर थोडं आश्चर्यच वाटेल ना… इंडोनेशियातील सुंबा द्वीपवरील प्रथा. जिथं सुरुवातीला मुलींचं अपहरण  केलं जातं त्यानंतर तिच्याशी लग्न केलं जातं. या प्रथेला काविन टांगकाप असं म्हटलं जातं. सुंबा द्वीपची ही वादग्रस्त अशी प्रथा आहे. या प्रथेनुसार एखाद्या मुलीशी लग्न करायचं असल्यास तिच्याशी लग्न करणारा पुरुष किंवा त्याचे मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक त्या मुलीला जबरदस्ती घेऊन जातात. ही प्रथा थांबवण्याची मागणी अनेक महिला करत आहेत. मात्र तरीदेखील सुंबातील काही ठिकाणी ही प्रथा सुरूच आहेत. नुकतंच दोन मुलींचं अपहरण करतानाची घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर केंद्र सरकारने पावलं उचलली. या प्रथेवर बंदी घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अपहरणाचं एक प्रकरण ज्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यापैकी एका मुलीने अशा पद्धतीने झालेल्या लग्नाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. Weird tradition : इथं थाटात होतं भुतांचंही लग्न, जिवंत माणसं असतात वऱ्हाडी; पण कसं लावतात आणि का? ज्या मुलीचं लग्नासाठी अपहरण करण्यात आलं तिनं सांगितलं, कारमध्ये तिने आपल्या आई-वडिलांना आणि बॉयफ्रेंडला मेसेज केला. ज्या घरात तिला पळवून नेलं ते तिच्या वडिलांचे दूरचे नातेवाईक होते. तिथं भरपूर लोक आधीपासूनच वाट पाहत उभे होते. जेव्हा मी तिथं पोहोचले तेव्हा ते गाणी गाऊ लागले आणि लग्नाच्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली. महिला अधिकाऱ्यांचा समूह पेरूआतीने गेल्या चार वर्षात महिलांचं अपहरण झाल्याच्या अशा सात घटना नोंदवल्या आहेत. मात्र त्यापैकी फक्त तीन मुलींचीच सुदैवाने या लग्नापासून सुटका झाली. या द्वीपवर दूर असलेल्या परिसरात अशा अनेक घटना झाल्या असाव्यात, असं या महिला समूहाने संगितलं. पेरुआतीच्या स्थानिक प्रमुख अप्रिसा तारानाऊ म्हणाल्या, “या मुली अशा लग्नाचा स्वीकार करतात कारण त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसतो. काविन टांगकाप अनेकदा अरेंज मॅरेजचाच प्रकार असतो” Weird Tradition : इथं हळदीऐवजी नवरीला फासतात काळं; घालतात चिखलाची अंघोळ प्रत्येक देशाची, तिथल्या राज्याची किंवा प्रांताची, शहराच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. मात्र काही प्रथा इतक्या विचित्र असतात की ऐकूनच धक्का बसतो. त्यापैकी इंडोनेशियाच्या सुंबा द्वीपवरील ही प्रथा आहे. आता ही प्रथा बंद करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात