नवी दिल्ली, 21 डिसेंबर: एका तरुणानं (A Youth) त्याच्या होणाऱ्या पत्नीशी (Life partner) चर्चा न करताच हनीमूनचा विचित्र प्लॅन (Strange Plan of Honeymoon) तयार केला. तो ऐकून होणाऱ्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली (Wife gets angry) आणि रागाने ती लालबुंद झाली. यावर काय करावं, हे त्यालाहीतरुणाने बनवला हनीमूनचा विचित्र प्लॅन, ऐकून गर्लफ्रेंडचा झाला तिळपापड समजेना. खरं तर हनीमून ही पती आणि पत्नी या दोघांची खासगी सहल असते. दोघांनी लग्नानंतर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि भावी वैवाहिक जीवनासाठी तयार होणं यासाठी हनीमून असतो. मात्र हनीमूनचा मूळ उद्देश समजून न घेताच तरुणानं त्याच्या मित्रांसोबत वेगळाच प्लॅन केला. मित्रांनाही केलं आमंत्रित तरुणानं जेव्हा मित्रांना हनीमूनचा प्लॅन सांगितला, तेव्हा ते फारच एक्साईट झाले. तरुणानं जाहीर केलेल्या माहितीनुसार आपल्या मित्रांना ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती, त्याच ठिकाणी आम्ही हनीमून प्लॅन केला होता. अनेक वर्षांपासून त्या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा होती. आता तू हनीमूनला चाललाच आहेस, तर आम्हीसुद्धा तुझ्यासोबत येऊ का, असा प्रश्न मित्रांनी विचारला. मित्रांच्या भावना आणि त्यांची उत्कंठा लक्षात घेऊन मीदेखील त्यांना नकार दिला नाही, असं तरूण म्हणाला. मित्रांनी केला आग्रह गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हा सर्व मित्रांची एका ठिकाणाला भेट देण्याची इच्छा होती. मात्र अनेकदा प्लॅन करूनही ती पूर्ण होत नव्हती. आता आम्ही नेमके त्याच ठिकाणी चाललो आहोत, तर मित्रांनाही सोबत न्यायला काय हरकत आहे, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मित्रांनी सोबत यायला काहीच हरकत नाही, असं मी त्यांना सांगितलं आणि मित्र खूश झाले. गर्लफ्रेंडचा चढला पारा आपल्या पार्टनरला जेव्हा तरुणाने ही गोष्ट सांगितली, तेव्हा तिला काय करावं, ते कळेना. तिचे कान गरम झाले आणि मनात प्रचंड राग दाटून आला. आपल्याला न विचारता असा निर्णय़ तू घेऊच कसा शकतोस, असा सवाल भावी पत्नीनं आपल्याला विचारल्याचं तरुणानं म्हटलं आहे. आपली पार्टनर ही बाब एवढ्या सिरियसली घेईल, असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं, असंही तरुणानं म्हटलं आहे. हे वाचा- उपचार सोडून भलतंच काम; Gynecologist ने महिलांसोबत केलेलं कृत्य जाणून हादराल चित्रविचित्र प्रतिक्रिया अशा माणसासोबत लग्नाचा निर्णय रद्द करण्यासाठी एवढं कारण पुरेसं आहे, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर तू मित्रांसोबच्या सहलीला बायकोला आमंत्रित करतो आहेस, अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.