जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Social media वरील उपाय पडला महागात! 21 लाख रुपये खर्चून तरुणाने शरीराची लावली वाट

Social media वरील उपाय पडला महागात! 21 लाख रुपये खर्चून तरुणाने शरीराची लावली वाट

Social media वरील उपाय पडला महागात! 21 लाख रुपये खर्चून तरुणाने शरीराची लावली वाट

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या नादात तरुणाने जे केलं, त्यानंतर त्याला पश्चाताप होतो आहे. आता इतर नेटिझन्सना तो सावध करतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 24 फेब्रुवारी : टीव्ही किंवा सोशल मीडियावरील बड्याबड्या स्टार्सना पाहून आपणही असं दिसावं असं अनेकांना वाटतं. त्यांच्यासारख्या दिसण्यासाठी ते लोक जे करतात ते स्वतःही करण्याचा प्रयत्न करतात. किंवा त्यांनी आपल्याबाबत एखादं सिक्रेट सांगितलं, सल्ला किंवा टीप्स दिल्या तर त्यासुद्धा लगेच फॉलो करतात. असंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ऐकणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ऐकून त्याने स्वत:ची वाट लावली आहे. डरहममध्ये राहणारा डेल सेंट कलन (Dale Saint Cullen) ज्याने फिटनेस प्रेमी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सच्या दबावात स्वतःची अवस्था करून घेतली. काहीच विचार  न करता त्याने पाण्यासारखा पैसा घालवला आणि आपल्या शरीरावर चाकू-कात्री फिरवून घेतल्या. आता त्याच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन परफेक्शनच्या दुनियेत हा तरुण अडकला. त्याने आपल्या डोक्यात आपला एक चेहरा तयार केला आणि तसा नवा लूक मिळवण्यासाठी त्याने स्वतःवर बऱ्याच कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्या. यासाठी त्याने तब्बल 21 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. वेगवेगळ्या देशात जाऊन सर्जरी करून घेतल्या. हे वाचा -  SHOCKING! GYM मध्ये EXCERCISE करतानाच महिलेचा गेला जीव; CCTV कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू 28 वर्षांच्या डेलने चिन इम्लांट केलं. नाकासहित बऱ्याच प्लॅस्टिक सर्जरी करून घेतल्या. अधिक चांगला लूक मिळवण्याच्या नादात तो सर्जरीच्या जाळ्यात अडकला गेला. नेहमी काही ना काही नवं ट्राय करत होता. पण आता त्याला आपल्या या मूर्खपणाबाबत पश्चाताप होतो आहे. डेल आता पूर्णपणे बदलला आहे. वजनापासून चेहऱ्यापर्यंत त्याने सर्वकाही सर्जरीच्या माध्यमातून आपल्याला हवं तसं मिळवलं. पण त्यानंतर जे मिळालं त्यावर तो समाधानी, आनंदी नाही. इतर सोशल मीडिया युझर्सनी असं करू नये, असं आवाहन त्याने केलं आहे. तुम्हाला तुमच्या शरीरासोबत असं काही करायचं आहे, तर आधी त्याची पडताळणी करून घ्या. सर्जन्स, प्रोसिजर, त्याचे परिणाम याची माहिती घेऊनच कोणतंही पाऊल उचला. कमीत कमी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर विश्वास ठेवून किंवा त्याच्या दबावात असा निर्णय घेऊ नका. हे वाचा -  कापलेले पाय हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता व्यक्ती, बघताच लोकं लागले किंचाळू डेल अद्यापही काही कॉस्मेटिक प्रोसिझर्स करतो आहे. पण आता पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर माहिती मिळवल्यानंतरच तो असं करतो आहे, त्यामुळे त्याचा याचं काही वाटत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात