मुंबई 20 डिसेंबर : आपल्याला माहीत आहे की, विवाह सोहळ्यात अनेक विधी असतात. जवळपास सर्व विधी हे आनंदी वातावरणात पार पडतात. एक विधी मात्र वेगळा असतो. या विधी दरम्यान फार भावनिक वातावरण तयार होतं. हा विधी तुमच्या लक्षात आलाच असेल. हा विधी म्हणजे वधूच्या पाठवणीचा विधी. निरोपाचा क्षण वधूच्या आई-वडिलांसाठी खूप भावनिक क्षण असतो. मुलीला लहानाची मोठी होताना आई- वडिलांनी पाहिलेलं असतं, तिला जपलेलं असतं. मुलगी ही आई वडीलांच्या काळजाचा तुकडा असते. हा काळजाचा तुकडा विवाहानंतर तिच्या पतीची जबाबदारी होतो. तेव्हा वधूला निरोप देतानाचे भावनिक वातावरण आपण कुठल्यातरी लग्नात अनुभवलेच असेल. एक व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू वराकडे जाण्यासाठी गाडीत बसलेली आहे. तिला निरोप देताना मात्र कोणीही रडत नाहीये. न रडण्याचे कारण जेंव्हा वधू तिच्या घरच्यांना विचारते तेंव्हा तिच्या कुटुंबीयांनी दिलेले उत्तर फारच मजेशीर आहे. चला तर जाणून घेऊया की वधूचे कुटुंबीय तिला निरोप देताना का रडत नाहीयेत. हे ही पाहा : लग्नात डान्स करणाऱ्या वऱ्हाड्यांच्या पाया खालची जमीनच सरकली, Video पाहून बसेल धक्का हा व्हिडिओ वेडिंग व्हिज्युअल नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की, एका आलिशान कारमध्ये वधू बसलेली आहे. तिला निरोप देण्यासाठी गाडी जवळ तिचे कुटुंबीय जमलेले आहेत. मात्र तिला निरोप देताना कोणाच्याही डोळ्यांत पाणी नाहीये. हे पाहून वधू स्वतः अचंबित आहे. तिला अपेक्षित होतं की, तिला निरोप देताना सर्व रडतील पण तसं काहीच होत नाहीये. शेवटी तिला राहवत नाही व ती आपल्या कुटुंबीयांना विचारते की, “तुम्ही का रडत नाहीये?” तेंव्हा कुटुंबीय जे उत्तर देतात ते फारच मजेशीर आहे. ते ऐकून स्वत: वधू गोड हसते.
सहसा आपण जे इतर ठिकाणी पाहतो की, वधू आपल्या पतीच्या घरी जाताना रडते. कारण ती आपल्या जन्मदात्या व लहानाचे मोठे करणाऱ्या आई-वडिलांना, तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना सोडून जात असते. तेंव्हा सर्वच फार भावनिक असतात. कित्येकदा अशा वातावरणात वराच्या डोळ्यांतूनदेखील अश्रू येतात.
पण हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्याच्या विरुद्ध आहे. वधू जेंव्हा आपल्या कुटुंबीयांना रडत नसल्याचं कारण विचारते, तेंव्हा ते गमतीने म्हणतात की, रडल्याने त्यांचा मेकअप खराब होईल. या उत्तरामुळे सगळेच हसतात. स्वतः वधूदेखील हे उत्तर ऐकून हळूच गोड हसते व सर्वांना बाय करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.