मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीला उचलताना नवरदेवही खाली पडला, नंतर त्याने जे केलं ते पाहून आवरणार नाही हसू

नवरीला उचलताना नवरदेवही खाली पडला, नंतर त्याने जे केलं ते पाहून आवरणार नाही हसू

एकंदरीतच लग्नातील फजितीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो आणि व्हिडिओ शूट करताना नवरदेव नवरीसह पायऱ्यांवरून पडला. मात्र, त्याने ज्या पद्धतीने ही परिस्थिती सांभाळली त्याचंही लोक कौतुक करत आहेत.

एकंदरीतच लग्नातील फजितीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो आणि व्हिडिओ शूट करताना नवरदेव नवरीसह पायऱ्यांवरून पडला. मात्र, त्याने ज्या पद्धतीने ही परिस्थिती सांभाळली त्याचंही लोक कौतुक करत आहेत.

एकंदरीतच लग्नातील फजितीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो आणि व्हिडिओ शूट करताना नवरदेव नवरीसह पायऱ्यांवरून पडला. मात्र, त्याने ज्या पद्धतीने ही परिस्थिती सांभाळली त्याचंही लोक कौतुक करत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 जानेवारी : सोशल मीडियावर रोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. काही मजेशीर असतात, काही अपघाताचे, प्राण्यांचे तर काही लग्नातले असतात. लोकांच्या हातात सतत फोन असतो, त्यामुळे बऱ्याचदा लहान लहान मूव्हमेंट्स त्यात रेकॉर्ड होतात आणि मग तो व्हिडिओ एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला की तो व्हायरल होतो. सध्या एका लग्नातला असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    या व्हिडिओमध्ये वरमाला झाल्यानंतर एक वर आपल्या वधूला उचलून घेऊन मंचावरून खाली येत असतो. तेव्हाच अशी काही घटना घडते जी पाहून सगळेच चकित होतात. मात्र, नवरदेव शांत राहत, ती परिस्थिती संयमाने हाताळतो. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. आता तुम्ही विचार करत असाल की वराने असं का केलं असेल आणि नक्की काय घडलं असेल.

    हेही वाचा : VIDEO - अरे देवा! रॅम्पवर पडताच सुपरमॉडेलची ही काय अवस्था झाली; कॅटवॉक सोडा साधं चालणंही विसरली

    View this post on Instagram

    A post shared by joya jaan (@joyajaan816)

    वधू आणि वर एकमेकांना हार घालतात. यानंतर दोघेही फोटोशूट करतात, पण यादरम्यान नवरदेव वधूला इम्प्रेस करण्यासाठी दोन्ही हातांनी उचलून स्टेजवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतो. तो पायऱ्या उतरू लागतो. यादरम्यान त्याचा पाय घसरतो आणि तो नववधूसह जिन्यावरून पडतो. दोघांनाही दुखापत होत नाही, पण त्यानंतर वर वधूच्या गालावर किस करतो. या वेळी तो काही नाही झालंय, असंही म्हणतो असं या व्हायरल व्हिडिओत दिसतंय.

    वराने वधूच्या गालावर किस करताच समोर उभे असलेले पाहुणे त्याच्याकडे पाहून हसायला लागतात. नवरीला बघून नवरदेवही मोठ्याने हसायला लागतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. joyajaan816 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलंय. तसेच अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. लोक त्यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “तुम्ही लग्न करत आहात की नाटक? तर, एकाने सध्या नवीन लग्न आहे, त्यामुळे तिला उचलायला बरं वाटतंय, पण नंतर मात्र तिचं ओझं वाटेल, अशी कमेंट केली आहे.

    First published:

    Tags: Viral video.