मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ही लग्नपत्रिका आहे की संविधान! वकिलाने लग्नासाठी छापलेलं कार्ड पाहून सगळेच अवाक

ही लग्नपत्रिका आहे की संविधान! वकिलाने लग्नासाठी छापलेलं कार्ड पाहून सगळेच अवाक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कार्डवर निमंत्रण लिहिलं नसून नोटीस लिहिली गेली आहे. यात सांगितलं गेलंय की आर्टिकल 21 म्हणजेच जगण्याच्या अधिकारांतर्गत लग्न करण्याचाही अधिकार असतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू झाला आहे, त्यामुळे अनेकजण लग्नगाठ बांधत आहेत. अशात लग्नातील विविध निराळ्या गोष्टी सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होतात. काही व्हिडिओमध्ये नवरीबाई लग्नात डान्स करताना दिसते, तर काही व्हिडिओमध्ये नवरी ऑटोमधून किंवा स्वतः गाडी चालवून मंडपात एण्ट्री करताना दिसते. मात्र आता एक अजब लग्नपत्रिका समोर आली आहे. ही एका वकिलाच्या लग्नाची पत्रिका आहे (Constitution-themed wedding card) . या कार्डमध्येच संविधाात असलेल्या तरतुदी आणि कायद्यांचा उल्लेख केला गेला आहे.

सध्या सोशल मीडियावर गुवाहाटी येथील अजय शर्मा नावाच्या एका व्क्तीची लग्नपत्रिका चांगलीच चर्चेत आहे. पहिल्या नजरेत हे कार्ड इतर सामान्य लग्नपत्रिकेप्रमाणेच दिसते. मात्र प्रत्यक्षात हे कार्ड अतिशय वेगळं आहे. हे कार्ड वाचूनच तुम्हाला जावणेल की हे एखाद्या वकिलाच्या लग्नाचं आहे (Wedding Card like court notice). मात्र न्यूज १८ या कार्डची पुष्टी करत नाही. हे एक व्हायरल कार्ड आहे.

कार्डमध्ये भगवान गणेश किंवा इतर कोणत्याही देवाच्या ऐवजी न्यायाच्या तराजूचं चित्र आहे, ज्यात दोन्ही बाजूंनी त्यांच्या पत्नीचं आणि त्यांचं नाव लिहिलं गेलं आहे. लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नाव एकाच रांगेत लिहिलं आहे ज्यातून हा संदेश दिला गेला की वर आणि वधू समानच आहेत. कार्डवर निमंत्रण लिहिलं नसून नोटीस लिहिली गेली आहे. यात सांगितलं गेलंय की आर्टिकल 21 म्हणजेच जगण्याच्या अधिकारांतर्गत लग्न करण्याचाही अधिकार असतो. यामुळे आपल्या याच अधिकाराची वापर करून ते लग्नबंधनात अडकत आहेत.

इतकंच नाही तर लोकांना रिसेप्शनमध्ये बोलवण्यासाठी आर्टिकल १९ चा उल्लेख केला आहे. याचा अर्थ आहे लोक शांततेत एकत्र येऊ शकतात. कार्डच्या दुसऱ्या पेजवर हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 बद्दल सांगण्यात आलं आहे. या व्यक्तीचं लग्न 28 नोव्हेंबरला असून 1 डिसेंबरला रिसेप्शन होणार आहे. कार्डच्या शेवटी लिहिलं आहे 'जेव्हा वकिलांचं लग्न होतं तेव्हा ते हा म्हणत नाहीत तर नियम आणि अटी स्वीकार करतात. हे अनोखं कार्ड सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने यावर कमेंट करत म्हटलं, आयुष्याच्या कोर्टात केस जिंकल्याबद्दल तुमचं अभिनंदन.

First published:

Tags: Viral news, Wedding rules