मराठी बातम्या /बातम्या /Viral /

..अन् आईनं निर्जीव वस्तूतही आणला जीव, सोशल मीडियावर होतीये 'या' गजऱ्याची चर्चा

..अन् आईनं निर्जीव वस्तूतही आणला जीव, सोशल मीडियावर होतीये 'या' गजऱ्याची चर्चा

 एका आईनं आपल्या मुलीसाठी टिश्यू पेपरपासून (tissue paper) खास गजरा (Gajra) तयार केला आहे. हा गजरा पाहून कोणालाही वाटणार नाही की, तो खोट्या फुलांचा गजरा (floral gajra) आहे, इतका तो नैसर्गिक फुलांसारखा सुंदर दिसतो.

मुंबई 26 फेब्रुवारी : आई आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी काहीही करु शकते. अशाच एका आईनं आपल्या मुलीसाठी टिश्यू पेपरपासून (tissue paper) खास गजरा (Gajra) तयार केला आहे. हा गजरा पाहून कोणालाही वाटणार नाही की, तो खोट्या फुलांचा गजरा (floral gajra) आहे, इतका तो नैसर्गिक फुलांसारखा सुंदर दिसतो. मात्र एका जागेवर तासनतास बसून गजरा तयार केल्यामुळं या वयोवृद्ध आईला सांधेदुखीचा त्रास होऊ लागला आहे, तरीही आपल्या मुलीसाठी आवडती गोष्ट केल्याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या या गजऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 'आईनं माझ्यासाठी टिश्यू पेपरपासून तयार केलेला गजरा’ असं कॅप्शन देत, सुरेखा पिल्लई (surekha pillai) या ट्वीटर युजरनं आपल्या अकाउंटवर या गजऱ्याचा एक सुंदर फोटो पोस्ट केला असून, हा गजरा स्वत:च्या केसांमध्ये माळून त्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. ‘मी केसांमध्ये घातलेल्या इतर फुलांपेक्षा माझ्या आईने तयार केलेला गजऱ्याचा खूपच सुंदर सुवास येत आहे.’ तसंच, ‘माझ्या आईनं सांधेदुखीचा त्रास होत असतानासुद्धा तासंतास बसून माझ्यासाठी हा गजरा तयार केला आहे,’ असं ही सुरेखा पिल्लई यांनी म्हटलं आहे. अतिशय सुंदर असा हा गजरा पाहून युजर्स आश्चर्यचकीत झाले असून, हा टिश्यू पेपरपासून नव्हे तर खरोखरच्या फुलांचा हा गजरा असल्यासारखं वाटत आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. सुरेखा यांच्या पोस्टला युजर्स भरभरुन लाइक्स आणि कमेंट्स करत त्यांच्या आईच्या कौशल्याचं कौतुक करत आहेत. एका युजरनं ‘आईचा जादूई स्पर्श’ असं म्हणत, आईनं निर्जीव गोष्टीतही जिवंतपणा आणला असल्याची कमेंट केली आहे. डॉ. दीपा शर्मा या ट्विटर युजरनं कमेंटमध्ये असं लिहिलं आहे की, 'सुरेखा यांनी हा गजरा टिश्यु पेपरपासून तयार केला असल्याचं नमूद केलं नसतं तर ती खरोखरचीच फुलं आहेत असं मला वाटलं असतं.' त्यांनी सुरेखाच्या आईला 'आश्चर्यकारक कलाकार' म्हटलं आहे. दरम्यान, सुरेखा यांच्या या ट्विटला 1600 पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या असून, अनेकांनी रिट्विट सुद्धा केलं आहे.
First published:

Tags: Artificial gajra, Creativity, Floral gajra, Tissue paper gajra, Trending photo, Twitter, Viral photo

पुढील बातम्या