• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • एकत्रित थिरकले मित्र-मैत्रिणी, व्हॅनच्या टपावर जाऊन शाहरुखच्या छैय्या...छैय्यावर केला जबरदस्त डान्स

एकत्रित थिरकले मित्र-मैत्रिणी, व्हॅनच्या टपावर जाऊन शाहरुखच्या छैय्या...छैय्यावर केला जबरदस्त डान्स

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा जबराट डान्स हा आजपर्यंत लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: बॉलिवूडच्या (Bollywood) इतिहासात सर्वांत बेस्ट डान्स (Best Dance) कोणता असा प्रश्न विचारल्यावर.. डोक्यात पहिलंच येतं की शाहरुख खानचा छैय्या छैय्या (Chaiya Chaiya) ... शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा जबराट डान्स हा आजपर्यंत लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आजही लोकांना हे गाणं ऐकायला खूप आवडतं, तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक रील पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियावर रिल्सची खूप क्रेझ आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मित्रांचा एक ग्रुप शाहरुख खानच्या या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या ग्रूपच्या डान्स व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्स खूप पसंत करत आहेत, त्याचबरोबर लोक त्यावर मस्त प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चार मित्रांचा एक ग्रुप थाप या सुंदर गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते मित्र एका व्हॅनच्या वर दिसत आहे. या ग्रुपनं शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांनी केलेला सीन पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
  व्हायरल होत असलेला व्हिडिओ जैनील मेहताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. जैनील एक एक डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. हेही वाचा- Ashes मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या दिग्गजाला BCCI करणार बॉलिंग कोच या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'हा डान्स खूप सुंदर आहे' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'भाऊ हा डान्स खूप सुंदर आणि अप्रतिम आहे' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'या गाण्यावर डान्स करणे खरोखरच अप्रतिम आहे'. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'हे गाणे खरोखर चांगले आहे, मला आजही ते ऐकायला आणि बघायला खूप आवडते. शाहरुख आणि मलायका यांनी या गाण्यावर अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे.' यामध्ये हजारो इमोजी देखील पाहायला मिळत आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: