ब्रिसबेन, 23 जानेवारी : ब्रिसबेनमधील एका 30 वर्षीय व्यक्तीची ज्या कारणामुळे झोप उडाली ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. त्याचं झालं असं की रात्री उशिरा त्या लकी माणसाला जाग आली. त्याने मेल तपासण्यासाठी मोबाइल हातात घेतला. यातील एक मेल पाहिला आणि त्याची झोपच उडाली. त्या मेलमध्ये या माणसाच्या अकाऊंटमध्ये तब्बल 75 कोटी रुपये क्रेडिट झाल्याचं दिसलं. हे पाहून तो हैराणचं झाला आणि इतकी मोठी रक्कम पाहिल्यानंतर तो तर दिवास्वप्नचं पाहू लागला, जे तो या पैशाने पूर्ण करू शकणार आहे.
हा व्यक्ती जेव्हा रात्री मेल चेक करीत होता, त्यावेळी यातील एक मेल पावरबॉल लॉटरीचा होता. या व्यक्तीने सांगितलं की, मेल पाहिल्यानंतर तो रात्रभर झोपू शकला नाही. ही रक्कम तो आपली आई व स्वत:साठी घर खरेदी करण्यासाठी वापर करणार असल्याचं सांगितलं. पावरलॉब यांनी 21 जानेवारी रोजी घोषित केलेल्या निकालानुसार या व्यक्तीला 10 मिलियन डॉलरचं बक्षीस लागलं आहे. इतकच नाही तर याला अनेक लहान लहान बक्षीसही मिळाली आहेत. आणि त्याच्या खात्यात तब्बल 10367144 डॉलरची रक्कम क्रेडिट झाली.
हे ही वाचा-इंग्रजीवरुन दोन महिलांनी कॅफे मॅनेजरची उडवली खिल्ली; VIDEO शूट केला आणि...
त्याने सांगितलं की, त्या रात्री तो लवकर झोपला होता. मात्र अचानक रात्री 2 वाजता त्याला जाग आली आणि तो आपले मेल्स चेक करीत होता. यादरम्यान पावरलॉबचा एक मेल त्याने पाहिला. त्याने सांगितलं की, कधी कधी तो पावरबॉलही खेळतो. मेलमध्ये बक्षीसाची रक्कम पाहून तो रात्रभर झोपू शकला नाही. मात्र दरम्यान त्याने सांगितलं की, तो आपलं काम सुरू ठेवणार आहे. हे बक्षीस जिंकल्यामुळे त्याच्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न कमी झाले असतील, मात्र त्याचं म्हणणं आहे की, तो आपल्या आईसाठी घर खरेदी करेल. तो पुढे म्हणतो की या पैशातून बरीच कामं करायची आहेत. मात्र सध्या तो इतका उत्साहित आहे की काहीच ठरवू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.