जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इंग्रजी बोलण्यावरुन दोन महिलांनी कॅफे मॅनेजरची उडवली खिल्ली; सर्वांसमोर करायला लावलं हे कृत्य, पाहा VIDEO

इंग्रजी बोलण्यावरुन दोन महिलांनी कॅफे मॅनेजरची उडवली खिल्ली; सर्वांसमोर करायला लावलं हे कृत्य, पाहा VIDEO

इंग्रजी बोलण्यावरुन दोन महिलांनी कॅफे मॅनेजरची उडवली खिल्ली; सर्वांसमोर करायला लावलं हे कृत्य, पाहा VIDEO

इंग्रजी भाषा ही तुमचं कौशल्य ठरवू शकत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाकिस्तानच्या (Pakistan) प्रसिद्ध कॅफेतील दोन महिला मालकांनी आपल्या मॅनेजरची इंग्रजी बोलण्यावरवन थट्टा (Pakistani Cafe Owners Mocking Manager’s English) केली. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. यावरुन गोंधळ उडाल्यानंतर त्या दोघींनी माफी मागितली. 1 मिनिट आणि 18 सेकंदाच्या या क्लिपमधील महिलांची नावं उजमा आणि दीया असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी सांगितलं की, इस्लामाबादमधील कॅफे कॅनोलीच्या मालक आहेत. त्यांनी अशा वागणुकीबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या कॅफे मॅनेजरला इंग्रजीतून बोलायला सांगतात आणि त्यानंतर हसतात. कारण तो अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यात तो स्पष्टपणे बोलू शकत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे आणि पाकिस्तानात #BoycottCannoli टॉप ट्रेंडमध्ये आहे. व्हिडीओमध्ये उजमा आणि दीया म्हणतात की, मॅनेजर अवेसने त्यांच्यासोबत 9 वर्षे काम केलं आहे. दीया विचारले की, तुम्ही इंग्रजीसाठी किती वर्ग घेतले? अवैसने यावर दीड वर्षांदरम्यान तीन इंग्रजी अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्याचं सांगितलं. उजमा म्हणजे की, तुम्ही इंग्रजीतून सर्वांशी बोलाल..व्हिडीओमध्ये दोन महिलांना हसत असताना दाखवलं आहे. त्या अवेसच्या इंग्रजी बोलण्याचा हसतात असं दिसत आहे.

जाहिरात

हे ही वाचा- 10 लग्न केल्यानंतरही झालं नाही मूल; शेवटी शेतात मृत अवस्थेत आढळला शेतकरी व्हिडीओ शेअर करीत ट्विटर यूजरने लिहिलं आहे की, हे अत्यंत वाईट आहे. क्लास प्रिव्हलेज, कोलोनियल हँगओव्हर आणि पाकिस्तानी अभिजात वर्गाचा दबदबा..हे सर्व या क्लिपमध्ये आहे. येथे मॅनेजर हिरो ठरला आहे. त्याच्या हार्डवर्कसाठी सलाम. हा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 8.5 लाख वेळा पाहिला आबे. हे पाहून अनेक ट्विटर वापरकर्ते नाराज झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, आता मी या रेस्टॉरंटमध्ये पंजाबीमध्ये बोलेन. आणि त्यांच्या रेस्टॉरंटवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ट्विटरवर #BoycottCannoli टॉप ट्रेंड करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात