• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 आणि IPL नंतर विराट वन-डे टीमची कॅप्टनसीही सोडणार? 'या' निकालावर अवलंबून आहे भविष्य

T20 आणि IPL नंतर विराट वन-डे टीमची कॅप्टनसीही सोडणार? 'या' निकालावर अवलंबून आहे भविष्य

विराटसाठी (Virat Kohli) गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्यानं परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्यानं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : विराट कोहलीनं 3 दिवसांमध्ये दुसऱ्या टीमची कॅप्टनसी सोडली आहे.  (Virat Kohli Quits RCB Captaincy). आता तो पुढील आयपीएल स्पर्धेत आरसीबीची कॅप्टनसी करणार नाही. त्यानं रविवारी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केली आहे. विराटनं टी20 वर्ल्ड कपची कॅप्टनसी सोडल्यानंतर या निर्णयाची चर्चा सुरू झाली होती. पण तो इतक्या लवकर हा निर्णय घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. विराटसाठी गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्यानं परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्यानं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. भारतानं ही स्पर्धा जिंकल तर विराट कदाचित वन-डे टीमच्या कॅप्टनपदी कायम राहील. अन्यथा तो या फॉर्मेटमधील कॅप्टनसी देखील सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसं झालं तर 2023 साली भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीम उतरेल. आपण आगामी काळात वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टनसी करणार असल्याचं विराटनं सांगितलं आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तसंच होईल, हे कुणी सांगू शकत नाही. त्यानं वर्क लोडचं कारण देत कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट 2017 पासून तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन आहे. भारतीय क्रिकेट टीमचं आगामी कॅलेंडर पाहिलं तर टीम इंडिया वर्ल्ड कप शिवाय आणखी 20 टी 20 सामने खेळणार आहे. या सामन्यात विराट टीमचं नेतृत्त्व करणार नाही. IPL 2021 : पहिल्या मॅचआधी विराटचा मोठा निर्णय, RCB ची कॅप्टन्सीही सोडली या काळात जो कुणी टी20 टीमचा कॅप्टन होईल त्यानं चांगली कामगिरी केली तर त्याची वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून देखील आगामी वर्ल्ड कपपूर्वी निवड केली जाऊ शकते. सचिनच्या पावलावर विराटचं पाऊल, 3 दिवसांमध्ये घेतले 2 मोठे निर्णय BCCI काय निर्णय घेणार? विराट कोहलीनं 3 दिवसांपूर्वी टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर बीसीसीआयनं प्रसिद्धपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शहा (Jay shah) यांनी विराटचं अभिनंदन केलं. पण आगामी वन-डे वर्ल्ड कपमध्ये तो कॅप्टन राहणार की नाही? याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. याकडे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे विराट वन-डे टीमचा कॅप्टन राहणार की नाही? हे आगामी 2 महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: