मुंबई 28 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधीकधी असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे फारच मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसावं की दु:ख व्यक्त करावं हेच कळणार नाही. हा व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये ती आपल्या जिवाची पर्वा न करता पाठीमागे उडी मारते आणि त्यानंतर जे घडतं ते फारच धोकादायक आहे. बऱ्याचदा एखाद्या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, सेलेब्रिटी गर्दीमध्ये उडी मारतात आणि त्यांचे फॅन्स देखील त्यांना पकडतात. असाचं काहीसं या व्हिडीओमधील मुलीला करावसं वाटत असावं, ज्यामुळे तिने उंचावरुन लोकांच्या गर्दीमध्ये उडी मारते, मात्र तिच्यासोबत काही भलताच प्रकार घडला. हे ही वाचा : दोन ‘अडल्ट डॉल’ घेऊन मंदिरात पोहोचला तरुण, यामागचं कारण ऐकून बसेल धक्का हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, दारुच्या नशेत लोक काय करु शकतात, याचा तुम्हाल अंदाजा येईल. खूप भितीदायक दृश्य..
वास्तविक, हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया यूजर्सनी शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना ओह माय गॉड लिहिलं. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही, मात्र हा व्हिडीओ पाहताना फारच भीतीदायक वाटत आहे. काय घडलं? ही तरुणी बाल्कनीत उभी होती. तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर ती आधी हातावर लटकते. ती पाहाते तेव्हा खाली खूप लोक असतात. जे पाहून ही तरुणी अती उत्साहात येते. तिला असं वाटतं की खालील तरुण मुलं तिला झेलतील. ज्यामुळे तिला काहीही होणार नाही, पण तिचा हा प्लान फसतो. ही तरुणी जशी उडी मारते. खाली उभे असलेले लोक उभे तर असतात, मात्र तिला पकडण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि लांब जातात. ज्यामुळे ही तरुणी थेट खाली पडते. नशीबाने या तरुणीला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिला नक्कीच किरकोळ दुखापत झाली असणार.
लोकांना या तरुणीची अशी अवस्था पाहून हसावं तिच्यासाठी दु:ख व्यक्त करावं की तिच्या मुर्खपणावर हासावं हेच कळत नाहीय.