नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : देशभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सुदैवाने या महासाथीत (COVID Pandemic) ठीक होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. लॉकडाऊन असतानाही अनेकांनी लग्न केलं. काही मोजक्या जणांच्या सोबतीतच वर-वधुंनी सप्तपदी घेतली. यावेळी सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक होते आणि आताही आहेत. सोशल डिस्टन्सिंग व कार्यालय सॅनिटाइज करणेही अनिवार्य आहे. अशातचं एक व्हायरल व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भारतीय जुगाडाचं कौतुक कराल. कोरोना काळात हळदी समारंभाचा (Haldi Ceremony) एक व्हिडीओ समोर आला आहे. ऐरवी नवरीला हळद लावण्यासाठी आंब्याची पानं वापरली जातात. मात्र येथे या महिलांनी हळद लावायला रोलर ब्रश (Pant Roller Brush) आणला आहे. या ब्रशच्या साहाय्याने ते नवरीला हळद लावत आहेत. हा व्हिडीओ काही वेळातचं सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. लोकांना हा जुगाड खूप आवडला आहे.
Social distancing Haldi ceremony. 🤣🤣 pic.twitter.com/OPa7zA6hid
— Payal Bhayana 🇮🇳 (@payalbhayana) September 26, 2020
हे ही वाचा- पुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन व्हिडीओमध्ये दिसतंय की नवरी हळदी समारंभासाठी बसली आहे. तर एक महिला पेंट करण्याचा रोलर ब्रश उचलते आणि नवरीला हळद लावते. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिला हसू लागतात. या मजेशीर व्हिडीओला पायल भयाना हिने ट्विटरवर शेअर केला आहे.
शादी में हल्दी जैसी प्रथा को social distancing के नाम पे मज़ाक बना दिया।
— अभिषेक श्रीवास्तव🇮🇳 (@Abhishek_7386) September 27, 2020
कमाल का sense of humor है आपका।
हा व्हिडीओ 26 सप्टेंबर रोजी शेअर केला होता. ज्याचे आतापर्यंत 61 हजारांहून जास्त व्ह्यूज झाले आहेत. सोबतच 2 हजारांहून जास्त लाइक्स आणि 500 हून जास्त रिट्विट्स झाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. हळद लावायला रोलर ब्रश आता मंगळसूत्र घालायला ड्रोन आणतील, अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे.