मुंबई, 23 मार्च : सध्या कोरोनाने जगभर हाहाकार माजला आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांमधील सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, अभिनेता सुनिल ग्रोव्हरनं कोरोनामुळे झालेल्या गंभीर वातावरणातही एक मजेशीर असा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यानं सोशल डिस्टन्सिंग मुद्यावरून केरळच्या लोकांचा एक व्हिडओ शेअर केला आहे. एका दारुच्या दुकानासमोर लाइल लावलेले लोक दिसतात. मात्र या लोकांनी गर्दी केलेली नाही तर ते सर्वजण एकमेकांमध्ये तीन फूटांचं अतंर ठेवून असल्याचं दिसतं आहे. सुनिल ग्रोव्हरनं व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलं की, केरळच्या वाइन शॉपमध्ये लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहेत. एका माणसाकडं तर डबल प्रोटेक्शन आहे. त्यानं हेल्मेट घातलं आहे. याआधीही सुनिलने एक पोस्ट केली होती
. त्यावर त्यानं म्हटलं होतं की, कोरोना खूपच स्वाभिमानी आणि आत्मसन्मान असलेला व्हायरस आहे. हा व्हायरस तोपर्यंत तुमच्या घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला घेण्यासाठी घरातून बाहेर निघणार नाही. तुम्ही घरातच रहा त्याला घेण्यासाठी बाहेर नका जाऊ असा संदेशही दिला होता. कोरोना बाधितांची संख्या देशात वाढत चालली आहे. बॉलिवूडमध्ये कनिकाला कोरोना झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पाहा VIDEO : कर्फ्यूमध्ये गाडीवरून शायनिंग मारत फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी दिला चोप