मुंबई, 14 जून : सध्या सोशल मीडियावर फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे, अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना अत्यंत भावूक कॅप्शन्स देखील लिहिल्या आहे. या व्हिडीओमध्ये जमिनीवर एक शवपेटी ठेवली आहे. 16 Alexander lo despiden अशा नावाच्या मुलाचे शव या शवपेटीमध्ये ठेवले आहे. एका अहवालानुसार अलेक्झँडरच्या मृत्यूमध्ये पोलिसांचा हात आहे. यासंदर्भात NDTV इंडियाने वृत्त दिले आहे. हा व्हिडीओ मेक्सिकोमधील आहे. या 16 वर्षीय मुलाची हत्या झाली असून मृत्यूनंतर त्याचे शव त्याठिकाणी नेण्यात आले जिथे तो फुटबॉल खेळत असे. नजणू काही 16 वर्षीय अलेक्झँडर त्याचा शेवटचा गोल करतो. (हे वाचा- आत्महत्या नाही तर खून! सुशांत सिंह राजपूतच्या मामाचा आरोप, CBI चौकशीची मागणी ) तो गोल झाल्यानंतर त्याचे सर्व मित्र त्या शवपेटीला बिलगतात. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओ पाहणाऱ्यांना सुद्धा त्यांचे अश्रू आवरले नसणार. मित्राला गमावल्याचे दु:ख आणि त्याला शेवटचा गोल करताना पाहण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
54 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 50 लाखांहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 13 हजारपेक्षा जास्त वेळा व्हिडीओ रिट्वीट करण्यात आला आहे. (हे वाचा- आत्महत्या नाही तर खून! सुशांत सिंह राजपूतच्या मामाचा आरोप, CBI चौकशीची मागणी ) संपादन - जान्हवी भाटकर