जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हे आहेत सर्वात चलाख चोर! VIDEO पाहून व्हाल थक्क

हे आहेत सर्वात चलाख चोर! VIDEO पाहून व्हाल थक्क

हे आहेत सर्वात चलाख चोर! VIDEO पाहून व्हाल थक्क

भारतातील चोर त्यांच्या कामात (Viral video of smartest Indian thieves) किती सराईत झाले आहेत, हे दाखवणारा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 नोव्हेंबर: भारतातील चोर त्यांच्या कामात (Viral video of smartest Indian thieves) किती सराईत झाले आहेत, हे दाखवणारा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. चोरी करण्याच्या अनेक (Incidence of thefts) घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यातील काही चोऱ्या यशस्वी होतात, तर काही पकडल्या जातात. मात्र देशात असे काही चोर आहेत, जे इतक्या बेमालूमपणे चोरी करतात की चोरी झाल्याचं समजायलाही बराच वेळ लागतो. भारतीय चोरांचे किस्से दाखवणारा असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ठग ठग गँग ते बच्चा गँग देशातील वेगवेगळ्या शहरांमध्य सक्रीय असणाऱ्या वेगवेगळ्या गँगचा आढावा यात घेण्यात आला आहे. ठग ठग गँगपासून ते लहान मुलांनी केलेल्या चोऱ्यांपर्यंत अनेक प्रसिद्ध चोऱ्यांचे किस्से या व्हिडिओत दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे जगभरातील अव्वल चोरांच्या तुलनेत भारतीय चोरही कमी नसल्याची चर्चा आहे.

कारच्या डिकीतून चोरी एक गृहस्थ आपली कार घेऊन चाललेला असताना स्कुटीवरून चाललेले दोघे त्याला टायरमध्ये हवा कमी असल्याचं सांगतात. तो कारमधून उतरून पुढे येतो. तेवढ्यात आणखी दोघे तिथं येत त्याला एक पत्ता विचारतात आणि बोलण्यात गुंतवून ठेवतात. तेवढ्यात एकजण कारच्या मागे जातो आणि डिकीतील सामान चोरून तिथून पळ काढतो. आपल्या कारमध्ये चोरी झाली आहे, याची त्या कारमालकाला कल्पनाही येत नाही. हे वाचा - नोकरीच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक; 6वर्षांपासून गुंगारा देणारा भामटा अखेर गजाआड दुकानासमोरून बाईकची चोरी दुसऱ्या एका घटनेत एका दुकानासमोर बाईक उभी करून व्यक्ती दुकानात जाते. मात्र आत जाताना किल्ली बाईकलाच लावलेली असते. दुकानाच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चोराचं त्याकडे लक्ष असतं. तो बाईकच्या आसपास येरझाऱ्या घालतो आणि दुकानात गेलेल्या व्यक्तीकडे लक्ष ठेऊन राहतो. त्या व्यक्तीचं लक्ष बाईकवरून पूर्णपणे हटल्याचं लक्षात आल्यावर बाईक सुरू करून पळवून नेतो. व्यक्ती दुकानाबाहेर आल्यावर आपली बाईक गायब असल्याचं पाहते आणि तिला जबर धक्का बसतो. व्हिडिओ होतोय व्हायरल हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात