जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : खरं प्रेम कधीच मरत नाही! लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या आठवणीत ढसाढसा रडायला लागले 94 वर्षांचे आजोबा

VIDEO : खरं प्रेम कधीच मरत नाही! लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या आठवणीत ढसाढसा रडायला लागले 94 वर्षांचे आजोबा

VIDEO : खरं प्रेम कधीच मरत नाही! लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या आठवणीत ढसाढसा रडायला लागले 94 वर्षांचे आजोबा

प्रेम किती अमर असता बघा, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 22 एप्रिल : कोरोनामुळे जगातील जवळजवळ सर्व देश लॉकडाऊनमध्ये आहेत. कोरोनाला मात देण्यासाठी लोकांना घरात कैद करण्यात आले आहे. तर, वयस्कर लोकांची जास्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र घरात जास्त काळ राहूल लोकांचा संयम तुटू लागला आहे. अशाच एक आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक आजोबा आपल्या मृत पत्नीचा फोटो पाहून ढसाढसा रडताना दिसत आहेत. केन असे या आजोबांचे नाव असून, त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनमध्ये असलेले केन आपल्या पत्नीच्या आठवणीत रडताना दिसत आहेत. केन यांना सध्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या लॉजच्या वतीने हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला, “आम्हाला माहित आहे येथे राहणार लोक आपल्या लोकांच्या आठवणीत व्याकुळ झाले आहेत. पण आपण त्यांना नाही विसरत जे आपल्यासोबत नाही आहेत. आज आमच्या एका सहकाऱ्याने केन यांनी एक खास गिफ्ट दिले. या उशीवर त्यांच्या पत्नीचा फोटो आहे. हा फोटो पाहून केन खुपच भावूक झाले”, असे कॅप्शन दिले आहे. वाचा- ‘तुम्ही घरी येणार ना?’, मृत्यूच्या काही तासांआधी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं वच

वाचा- कौतुक करावं तेवढं थोडं! तब्बल 21 किमी धावून वेळेत ड्युटीवर पोहोचला बस कंडक्टर या लॉजच्या सहकाऱ्याने त्यांना ही उशी दिल्यानंतर केन यांना अश्रु अनावर होतात. केन यांना असे पाहून लॉजमधील सर्व कर्मचारी त्यांना मिठी मारून रडतात. डेली मेलच्या वृत्तानुसार, 94 वर्षीय या आजोबांचे नाव केन बेंबो आहे. 9 महिन्यांआधी त्यांच्या पत्नीने निधन झाले होते. त्यानंतर ते आपल्या पत्नीचा फोटो कायम सोबत ठेवतात. म्हणून त्यांनी पत्नीचा फोटो असलेले हे गिफ्ट देण्यात आले. वाचा- लॉकडाऊनमध्ये चिमुकलीचा पहिला बर्थडे पोलिसाने बनवला खास, पाहा VIDEO हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी, प्रेम किती अमर आहे, याचे हे उदाहरण असल्याचे म्हंटले आहे. हा व्हिडीओ पाहून एक क्षण आपल्यालाही आपल्या प्रियजणांची आठवण येते. संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात