मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले....

बॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले....

कामाच्या ठिकाणी एका बॉसनं कर्मचाऱ्यांना (Boss puts insulting poster in the office employees annoyed) उद्देशून लावलेल्या पोस्टरमुळे त्यांचा चांगलाच भडका उडाला आहे.

    कामाच्या ठिकाणी एका बॉसनं कर्मचाऱ्यांना (Boss puts insulting poster in the office employees annoyed) उद्देशून लावलेल्या पोस्टरमुळे त्यांचा चांगलाच भडका उडाला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची (Various types of bosses) काळजी घेणारे बॉस तसेही दुर्मिळच असल्याचे अनुभव येतात. कर्मचाऱ्याला घालून पाडून बोलणं, त्यांच्याकडून वाटेल तशी मेहनत करवून घेणं, त्यांच्या गरजांची बिलकूल काळजी न घेणं असे प्रकार करणारे बॉसच बहुतांश कंपन्यांमध्ये असल्याचे अनुभव आहेत. मात्र एका बॉसनं तर या सगळ्यावर कडी करत मानसिक क्रौर्याची परिसीमा (Height of cruelty) गाठल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. काय आहे पोस्टर? सोशल मीडिया साईट रेडिटवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये तुरुंगात बंद असणारा एक कर्मचारी दाखवण्यात आला आहे आणि त्याच्या चारही बाजूंना वेगवेगळे शब्द लिहिले आहेत. Nobody cares work harder असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुरुंगात डांबल्याची भावना निर्माण होत असली तरीदेखील त्याची आम्ही बिलकूल पर्वा करत नाही. तुम्हाला काम करावंच लागेल. तुम्ही जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत कुणीही तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न या पोस्टरमधून करण्यात आला आहे. डेंटिस्टच्या दवाखान्यात लागलं पोस्टर हे पोस्टर एका दंतवैद्याच्या दवाखान्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या डेंटिस्टचं हे क्लिनिक आहे, त्यानेच हे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी लावलं आहे. त्याचे असिस्टंट डेंटिस्ट हे काम न करता टाईमपास करत इकडे तिकडे फिरत असतात, असं त्याचं मत आहे. त्यामुळे त्यांना संदेश देण्यासाठीच आपण हे पोस्टर लावल्याचं बॉसनं म्हटलं आहे. हे वाचा- ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शरम वाटली पाहिजे! कर्मचारी संतापले हा आपला अपमान असून अशा बॉससोबत काम करण्याची इच्छा नसल्याचं एका कर्मचाऱ्यानं पोस्ट केलं आहे. तर ही पोस्ट वाचून नेटिझन्सही संतापजनक कमेंट्स देत आहेत. अशा बॉससोबत नोकरी न केलेलीच बरी, अशा अर्थाच्या कमेंट्सचा सध्या पाऊस पडत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Employment, Poster

    पुढील बातम्या