नवी दिल्ली 14 मार्च : गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील अनेक व्हिडीओ असेही असतात ज्यातून अनेकांना काहीतरी शिकायलाही मिळतं. असाच एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारत पुनरुत्थान नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. असा दावा केला जात आहे, की या व्हिडीओमध्ये कारमध्ये बसलेले न्यायाधीश आहेत.एका टोलनाक्यावरील या व्हिडीओमध्ये न्यायाधीश आणि टोल मॅनेजर यांच्यात वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यात टोल मॅनेजर न्यायाधीशांना कायद्याचा धडा शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. ट्विटरवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओमध्ये टोल प्लाजावर एक पांढऱ्या रंगाची कार थांबलेली दिसत आहे. त्याच्यामागे ट्रक उभा आहे. टोल नाक्यावरील कर्मचारी गाडीमध्ये बसलेल्या लोकांसोबत बातचीत करत आहेत. या कारमध्ये जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बसले आहेत. न्यायाधीश असल्यामुळे टोल न देताच तिथून निघण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र, टोल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोल भरण्याची मागणी केली.
याच दरम्यान टोल मॅनेजरही तिथे पोहोचले. यानंतर जिल्हा न्यायाधीश आणि टोल मॅनेजर यांच्यात टोल टॅक्सवरुन वाद सुरू झाला. यानंतर मॅनेजर न्यायाधीशांनी ही गोष्ट कशाप्रकारे समजून सांगतो, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मॅनेजरचं म्हणणं होतं, की टोल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना माफ असतो. तुम्ही जिल्हा न्यायालयातील असल्यानं तुम्हाला ही सुविधा नाही. हा व्हिडीओ 2020 मधील आहे. 2:20 मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये मॅनेजर न्यायाधीशांना अनेक गोष्टीनं कायद्यानं समजून सांगतात. शेवटी जिल्हा न्यायाधीशांना 80 रुपये टोल देऊनच पुढे जावं लागलं. हा व्हिडीओ आतापर्यंत 3,37,000 जणांनी पाहिला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबद्दलची माहिती मिळालेली नाही.