नवी दिल्ली 10 मे : दिल्ली मेट्रोमधील अजब घटनांचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. मेट्रोमधील अश्लील कृत्यांचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. नुकताच मेट्रोमध्ये बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण आणि तरुणी एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेट्रोच्या फरशीवर एक तरुण आणि तरुणी बसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणी तरुणाच्या मांडीवर झोपली असून दोघेही एकमेकांना किस करत आहेत. सोशल मीडियावर लोक अशा अश्लील व्हिडिओवर कारवाईची मागणी करत आहेत.
Video : आरं बस मागं; पुण्यात नवरीची बुलेटवर नादखुळी ग्रँड एन्ट्री, नवरदेवाला घेतलं डबलसीट; वऱ्हाडी पाहतच राहिले
दिल्ली मेट्रोमध्ये अश्लीलतेशी संबंधित व्हिडिओ सतत समोर आल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती. नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात DMRC ने मेट्रोमध्ये प्रवास करताना माफक पोशाख घाला, असं म्हटलं होतं. तसंच मेट्रोमधील प्रवासादरम्यान प्रवाशांशी योग्य वर्तन करा. आक्षेपार्ह कपडे घालून मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीने हे निवेदन जारी केले आहे.
मेट्रोमध्ये कपलचा रोमान्स
मेट्रो ऑपरेशन आणि मेंटेनन्स कायद्याच्या कलम 59 अंतर्गत, असभ्यता हा दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांच्या तक्रारी आल्यावर कारवाई करता येते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोमध्ये पाळत वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे अशा अश्लील कृत्यांवर कडक कारवाई व्हायला हवी, असं लोकांचं म्हणणं आहे. दिल्ली मेट्रोच्या बिकिनी गर्लचा व्हिडिओ खूप चर्चेत होता.