जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काला चष्मा गाण्यावर काकूंनी धरला ताल, गाणं सुरू होताच केली अशी स्टेप... Video पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

काला चष्मा गाण्यावर काकूंनी धरला ताल, गाणं सुरू होताच केली अशी स्टेप... Video पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

काला चष्मा गाण्यावर काकूंनी धरला ताल, गाणं सुरू होताच केली अशी स्टेप... Video पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

हा व्हिडीओ एका किटी पार्टीचा असल्याचं दिसत आहे, ज्यामध्ये सर्व काकू ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर जर एखादा ट्रेंड सुरू झाला की, मग सगळेच लोक त्याला फॉलो करु लागतात. मग ते एखादं गाण असो, एखादा डायलॉग किंवा मग एखादा फिल्टर. लोकांना ते फॉलो करायला आवडतं. यामुळेच आपण जेव्हा ही सोशल मीडिया ओपन करतो, तेव्हा आपल्या मोठ्या प्रमाणात या ट्रेंडशी संबंधीत व्हिडीओ दिसतात. सध्या अशाच एका ट्रेंडला सुरुवात झाली आहे, ज्यावर सगळेच लोक जमीनीवर बसून आपली कंबर हलवून नोरा फतेही सारखा डान्स करत आहेत. व्हिडीओमधील गाणं हे काही नवीन गाण नाही, ते फार जुनं आहे, परंतु आता या गाण्याच्या स्टेप्समुळे गाणं आणि त्याची स्टेप्स ट्रेंड होऊ लागली. यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की या गाण्याच्या तालावर काकू देखील ठेका धरु लागले आहेत. आपण बऱ्याचदा लहान मुलांना किंवा तरुण मंडळींना डान्सची स्टेप्स किंवा ट्रेंड फॉलो करताना पाहिलं आहे. परंतु या ट्रेंडला फॉलो करण्यापासून काकू देखील स्वत:ला थांबवू शकलेल्या नाहीत. हे वाचा : प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी महिलेचा जीवघेणा प्रयत्न; तिने असं काय केलं? पाहा Video या व्हिडीओमध्ये सर्व काकू ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका किटी पार्टीचा असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये अनेक महिला नाचण्यात मग्न आहेत आणि खूप मस्ती करताना दिसत आहेत. यामध्ये त्या नाचताना सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करताना दिसल्या. हे वाचा : बापरे! महिलेनं एकदाच बनवून ठेवलं संपूर्ण कुटुंबासाठीचं 8 महिन्यांचं जेवण, रंजक आहे यामागचं कारण जसं ‘काला चष्मा’ गाणं सुरु होत, प्रत्येकजण जमिनीवर उडी मारतो आणि आपल्या ज्यापद्धतीनं डोन्स येतो तसं नाचू लगतो. परंतु या गाण्यात एका महिलेनं जमीनीवरुन जी काही स्टेप्स केली, त्या स्टेप्सने सर्वांनाच वेड लावलं.

जाहिरात

videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सर्व महिलांच्या अशा मोज-मस्ती आणि वेगळेपणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होऊ लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात