मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलीचा जीममधील वर्कआऊटचा Video व्हायरल, पाहून चक्रावून जाल

मुलीचा जीममधील वर्कआऊटचा Video व्हायरल, पाहून चक्रावून जाल

व्हायरल

व्हायरल

अनेकजण आपल्या फीटनेसच्या बाबतीत सतत चिंतेत असतात. त्यामुळे दिवसातील बराच वेळ ते जीममध्ये घालवतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 22 मार्च : अनेकजण आपल्या फीटनेसच्या बाबतीत सतत चिंतेत असतात. त्यामुळे दिवसातील बराच वेळ ते जीममध्ये घालवतात. जीममध्ये गेल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. सोशल मीडियावर वर्कआऊट करताना अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. मुले मुली जीममधील वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक जीममधील व्हिडीओ व्हायरल झाला असून या विचित्र व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी वर्कआउट करताना दिसत आहे. ही मुलगी एकाच वेळी खांदे आणि पाय दोन्हींच्या कसरती करताना दिसतेय. पहिल्यांदा पाहता, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे साधा वाटेल. पण नीट बघितलं तर हैराण व्हाल. नीट पाहिल्यास या व्हिडिओमध्ये एक विचित्र गोष्ट दडलेली आहे. नीट पाहिलं तर त्यात मुलीच्या अंगाला मुरडल्याचं लक्षात येईल. पोटावर झोपून ती खांद्याचा व्यायाम करत असताना, तिचे शरीर सरळ पायांचा कसरत करत आहे. शेवटी, हे कसं शक्य आहे? असा विचार येतो.

इन्स्टाग्रामवरील @pareesaakbar नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा उन्हाळी बॉडी बनवण्यासाठी फारच कमी वेळ उरतो. म्हणजे कमी वेळात जास्त व्यायाम करावा लागेल.

अनेकांनी व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, हे पाहिल्यानंतर त्याच्या मेंदूला दुखत आहे. एकाने लिहिले हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. या मुलीचे शरीर इतके लवचिक नाही की ती तिच्या शरीराला असे वळवू शकेल. हा व्हिडिओ अशाप्रकारे एडिट करून तयार करण्यात आला आहे. मात्र, प्रकरण काहीही असले तरी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral, Workout