बाप रे! गाडी घेऊन पळाला चोर, नग्न अवस्थेत मालकानं केला पाठलाग, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

बाप रे! गाडी घेऊन पळाला चोर, नग्न अवस्थेत मालकानं केला पाठलाग, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

क्षणाचाही विलंब न करता या चोराचा पाठलाग केला. या वेळी आपण विवस्त्र आहोत याचाही विसर स्टिफनला पडला.

  • Share this:

न्यू कॅसल, 25 ऑक्टोबर : रात्रीच्या वेळी माणूस अगदी बिनधास्त आणि कोणतीही भीती मनात न बाळता झोपतो. मात्र अशावेळी घरात चोरी होत असेल तर झोप उडल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी चोरण्यासाठी आलेल्या चोराला पकडण्यासाठी आहे त्या अवस्थेत मालक घरातून बाहेर पडला. या चोराला गाठणं महत्त्वाचं होतं. ही घटना अमेरिकेतील न्यू कॅसलमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे.

चोराला पकडण्यासाठी मालकानं नग्न अवस्थेतच त्याचा पाठलाग केला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यू कॅसल इथे आपल्या गर्लफ्रेंडसोबत 29 वर्षीय स्टिफन राहातो. रात्री सगळं आवरून निवांतपणे स्टिफन झोपला असतानाचा अचानक त्याची बाहेर लावलेली गाडी चोरण्यासाठी चोर आला. त्यावेळी गाडीचा सिक्युरिटी सायरन वाजल्यानं तो आहे त्या नग्न अवस्थेत पळत बाहेर आला. त्यावेळी त्याला दिसलं की चोर त्याची कार चोरण्याचा प्रयत्न करत आहे.

हे वाचा-स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीय पार्क

स्टिफननं क्षणाचाही विलंब न करता या चोराचा पाठलाग केला. या वेळी आपण विवस्त्र आहोत याचाही विसर स्टिफनला पडला. चोराला पकडणं हे एकच त्याच्या डोक्यात होतं. या चोराचा पाठलाग करून त्याने पकडले आणि बेदम मारहाण देखील केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.स्टिफनचा आवतार पाहून चोरही आश्चर्यचकीत होऊन गेला. स्टिफननं या चोराला पकडून बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 25, 2020, 12:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या