जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या दिग्गजाला BCCI करणार बॉलिंग कोच

Ashes मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या दिग्गजाला BCCI करणार बॉलिंग कोच

Ashes मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या दिग्गजाला BCCI करणार बॉलिंग कोच

भारतीय क्रिकेटमध्ये एका दिग्गज कोचची लवकरच एन्ट्री होणार आहे. ट्रॉय कुले (Troy Cooley आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या या कोचचं नाव असून त्यांनी Ashes सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेटमध्ये एका दिग्गज कोचची लवकरच एन्ट्री होणार आहे. ट्रॉय कुले (Troy Cooley आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या या कोचचं नाव असून त्यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) फास्ट बॉलर्सचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. 2005 साली झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes 2005) ते इंग्लंड टीमचे कोच होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्या सीरिजमध्ये इंग्लंडच्या स्टीव्ह हार्मिसन, फ्लिंटॉफ, मॅथ्यू होगार्ड, सायमन जोन्स या फास्ट बॉलर्सच्या यशाचे श्रेय त्यांना दिले जाते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘सौरव गांगुली आणि जय शाहा यांनी ट्रॉय कुले यांना भारताच्या नव्या फास्ट बॉलर्सच्या पिढीसोबत काम करण्यासाठी तयार केले आहे. हे एक मोठं यश आहे. माझ्या माहितीनुसार त्यांच्याशी तीन वर्षांचा करार करण्यात येणार असून ते एनसीए क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर काम करणार आहेत.’ इंग्लंडला 2005 मधील अ‍ॅशेस सीरिज जिंकण्यात मदत केल्यानंतर कुले यांना ऑस्ट्रेलियानं करारबद्ध केले होते. ते 2010-11 सालापर्यंत ऑस्ट्रेलियन टीमसोबत होते. त्यानंतर ते ब्रिस्बेनमधल क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत काम करत आहेत. फास्ट बॉलर्सची नवी पिढी घडवण्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्याची बीासीसीआयची योजना आहे. सौरव गांगुली आणि जय शहा यांनी द्रविड आणि लक्ष्मण सोबत मिळून कुले यांच्याशी करण्यात येणाऱ्या विशेष कराराचे स्वरूप निश्चित केले आहे, अशी माहिती आहे. न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, वाचा का घेतला मोठा निर्णय? बॅटींग कोचची नियुक्ती माजी भारतीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर आणि शिव सुंदर दास यांची NCA मध्ये बॅटींग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. तर सितांशू कोटक हे तिसरे बॅटींग कोच असून ते भारत ए टीमसोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात