जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: पाळीव घोड्याचे लाड करत होती, पण अचानक त्याने केलं असं काही की शरमली तरूणी

VIDEO: पाळीव घोड्याचे लाड करत होती, पण अचानक त्याने केलं असं काही की शरमली तरूणी

VIDEO: पाळीव घोड्याचे लाड करत होती, पण अचानक त्याने केलं असं काही की शरमली तरूणी

ऑगस्टिन (Augustine) नावाची एक महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (social media influencer) आहे. टिकटॉक (TikTok), इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे लाखो चाहते आहेत. ऑगस्टिनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला घोडेपालनाची आवड आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 04 मार्च: माणूस आणि प्राणी यांचं (human and animal relation) नातं खूप खास असतं, दोघंही एकमेकांना खूप जीव लावतात. अनेक लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते. कोणी कुत्रा पाळतं, कोणी मांजर तर कोणी आणखी एखादा प्राणी. काही लोक तर प्राण्यांसोबतच राहतात. अनेक लोक प्राणी पाळतात आणि त्यांना मित्र म्हणून सोबत ठेवतात. बरेच लोक प्राण्यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतात, ते प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. अनेक प्राणीप्रेमी (animal lover) आपल्या प्राण्यांसोबतच्या मस्तीचे (Cute animal videos) फोटो, व्हिडीओ शेअर करतात. त्यापैकी काही व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये एक महिला आणि तिचा पाळीव घोडा पाहायला मिळतो आहे. ऑगस्टिन (Augustine) नावाची एक महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (social media influencer) आहे. टिकटॉक (TikTok), इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे लाखो चाहते आहेत. ऑगस्टिनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला घोडेपालनाची आवड आहे. तिच्या घोडेस्वारीचं (horse riding) लोकही कौतुक करतात. ती तिच्या घोड्यासोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये घोड्याने कॅमेऱ्यासमोर केलेलं कृत्य पाहून ऑगस्टिन हसायला लागते.

    जाहिरात

    व्हिडीओमध्ये ऑगस्टिन घोड्यांच्या तबेल्यात दिसत आहे. ती घोड्याला प्रेमाने किस करत आहे. काळ्या रंगाचा हा घोडाही तिचे लाड करताना दिसतोय. पण अचानक घोडा आपलं तोंड तिच्याकडे आणतो आणि तोंडाने तिच्या टॉपची चेन उघडतो. अचानक अशी गोष्ट झालेली पाहून  ऑगस्टिनला लाजल्यासारखं होतं आणि ती घोड्याच्या पकडीतून आपला टॉप सोडवत हसायला लागते. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. हे वाच- चक्क तरुणी या मॉडेलवर उधळतात लाखो रुपये; आपल्या BF सोबत करायला लावतात ‘हे’ काम या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. एकाने लिहिलंय, घोडा आणि त्याच्या मालकिणीची मैत्री खूप गोड दिसत आहे. तर दुसरा युजर म्हणतो की, हा व्हिडीओ ठरवून केल्याचं दिसतंय परंतु, तरीही ते खूप गोड आहे. एकीकडे लोक विनोदी कमेंट करत असताना दुसरीकडे काही लोक अश्लील कमेंटही करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात