नवी दिल्ली, 15 जून : उन्हाच्या तीव्रतेनं लोकांना हैराण करुन सोडलं आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडलं तर अक्षरशः अंगाची लाही लाही होते. माणसंच नाही तर प्राणीही उन्हाच्या तीव्र झळांना कंटाळले आहेत. त्यामुळे माणसांप्रमाणेच प्राणीही उन्हापासून वाचण्यासाठी काहीतरी आयडिया शोधून काढत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये कुत्र्यांनी उन्हाळा कंटाळून एक हटके आयडिया शोधली. गरमीपासून वाचण्यासाठी कुत्र्यांनी काय केलं ते पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं मन जिंकत आहे. कुत्र्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ते गरमीपासून वाचण्यासाठी थंड पाण्याच्या फायदा घेत आहे. कुत्र्यांचा हा अंदाज पाहून तुम्हीही त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही कुत्रे थंड पाण्याच्या भांड्यात डुबकी मारत आहेत. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी तेही थंड पाण्यात उतरुन स्वतःला थंड करत आहे. व्हिडीओमध्ये दोन पाण्याचे भांडे दिसत आहेत. ज्यामध्ये काही कुत्रे एका मागून एक उतरत गरमीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधच असून नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.
@Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 29 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटही येताना दिसत आहे. दरम्यान, उन्हाच्या झळांमध्ये लोक बाहेर पडायलाही घाबरत आहे. सकाळी 7 नंतरच गरमी जाणवायला सुरुवात होतेय. दुपारविषयी तर बोलायलाच नको. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी केलेले अनेक जुगाडही व्हायरल झाले. लोक अनेक हटके युक्त्या काढत गरमीपासून वाचण्याचा प्रयत्न करते.