मुंबई, 30 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला जात आहे. कुठे टेडी बेअर, कुठे छत्री तर काही ठिकाणी भल्या मोठ्या टोपी आणि शूजचा जुगाड करून सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका व्यक्तीनं तर भन्नाट जुगाडच केला आहे. सध्या या व्यक्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा केली आहे.
ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी या व्यक्तीनं गळ्यात अख्खी खाटच अडकवली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हा अजब जुगाड केला आहे. या व्यक्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. हा व्यक्ती गळ्यात खाट अडकवून सायकलवरून प्रवास करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ 20 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 130 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. या व्हिडीओवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. या व्यक्तीला कोरोनाच्या काळात कोणतीही जोखीम उचलायची नाही म्हणून हा जुगाड केल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरनं सायकल कोण चालवतंय याचा पत्ता लागणार नाही अशी मजेशीर कमेंट केली आहे. या व्हिडीओवर तुफान कमेंट्स करण्यात आल्या आहेत. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.