बाईक चालकासमोर अचानक भिडले दोन बैल, पुढे काय झालं पाहा VIDEO

बाईक चालकासमोर अचानक भिडले दोन बैल, पुढे काय झालं पाहा VIDEO

बैलांच्या या मारमारीमध्ये सुदैवानं दोन्ही तरुणांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालं

  • Share this:

सुंदरनगर, 29 ऑगस्ट : दिवसाढवळ्या बाजारपेठेत बाजारात भटकणाऱ्या दोन बैलांमध्ये झुंज झाली. हिमाचल प्रदेशातील भाजी मंडईमध्ये सुंदर नगर इथे ही घटना समोर आली आहे. बैलांच्या झुंजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोजपूर बाजारपेठेत म्युझिक वर्ल्ड शोरूमच्या बाहेर दोन तरुण बुलेट मोटारसायकलींवर बसले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दोन बैलांची हाणामारी सुरू झाली. त्यातला एक बैल तरुणाच्या अंगावर पडला. यावेळी तरुणानं कसाबसा आपला जीव वाचवला आणि तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचा-...आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO

हे वाचा-गवत खाता खाता गाढवाच्या तोंडात आला साप; काय झालं मग VIDEO पाहा

बैलांच्या या मारमारीमध्ये सुदैवानं दोन्ही तरुणांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालं आहे. या परिसरात सर्वात मोठा बाजारपेठ भरत असल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशावेळी भटकणाऱ्या बैलांमध्ये झालेल्या झुंजीमुळे मोठी खळबळ उडाली. त्यावेळी तिथे मोठी दुर्घटना घडली नाही. मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं आहे.

भोजपूर ही सुंदरनगर शहरातील मुख्य आणि गजबजलेली बाजारपेठ असते त्यामुळे इथे दररोज खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी आहे. या भटक्या प्राण्यांची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक व्यापा्यांनी प्रशासन व नगर परिषद सुंदरनगरकडे केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 29, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या