जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO

...आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO

...आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO

अचानक भल्या मोठ्या जहाजाला लागली अन् एका क्षणात दिसेनासं झालं. असा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

रोम, 29 ऑगस्ट : इटलीतील सार्डिनियाच्या किनारपट्टीवर एक भयंकर अपघात झाला. यामुळे काही काळ जलवाहतूकही थांबवावी लागली. समुद्रातच असलेल्या एका जहाजाला (Yacht) आग लागली. स्थानिक तटरक्षक दलानं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणात संपूर्ण जहाज जळू लागले. कोस्ट गार्डनं शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये हे Yacht जळताना दिसत आहे. एवढेच नाही तर अख्खं जहाज एका क्षणात पाण्यात बुडालंही. metre superyacht Lady MM असे या जहाजाचे नाव असून कोस्टा स्मेराल्डापासून 50 मैलांच्या अंतरावर या याटला आग लागली. दरम्यान, या याटला जेव्हा आग लागली तेव्हा त्यात 17 प्रवाशी उपस्थित होते. यातील नऊ क्रू मेंबर्स आणि कझाकस्तानमधील आठ प्रवाशी होते. याटला आग लागताच क्रू मेंबर्ससह प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वाचा- बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL कोस्ट गार्डनं शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये याटला लागलेली भयंकर आग, एका क्षणात हे याट कसं बुडालं हे दिसत आहे. वाचा- बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

वाचा- दुचाकी चालवताना अचानक 2 फूट हवेत उडाले बाईकस्वार, पाहा भीषण अपघाताचा थरारक VIDEO हे याट जळत असल्याचे ऑल्बिया येथील कोस्ट गार्डला सिग्नल द्वारे 25 ऑगस्टला कळले. या याटला मदत करण्यासाठी दोन बोटी आणि एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आला. काही तासांनंतर जळत्या याटमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. Lady MM इटालियन यार्डच्या लोकप्रिय ISA 470 मधले एक याट होते. एप्रिल फूल या नावाने बांधले गेलेले एक लक्झरी याट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात