नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : नाग किंवा अजगराचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात अशा वेळा महाकाय साप नदीत सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. एका 50 फूट अॅनाकोंडानं ब्राझीलची नदी पार केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अॅनकोंडा 50 फूट लांब खरंच आहे की नाही याबाबत चर्चा होत आहे. हा व्हिडीओ ब्राझीलमधल्या झिंगू नदीचा असल्याचा दावा केला जात आहे.
983 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. हा नेमका कोणता साप आहे आणि खरंच अॅनकोंडा आहे का यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओमध्ये शेअर करणाऱ्यानं दिलेल्या कॅप्शननुसार हा अॅनकोंडा 50 फूटाहून अधिक लांब आहे आणि तो नदी अगदी सहजपणे पार करून जात आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे का? या व्हिडीओमागचं सत्य काय आहे? याबाबत सोशल मीडियावर उत्सुकता आहे.
An anaconda measuring more than 50 feet found in the Xingu River, Brazil pic.twitter.com/FGDvyO76sn
— The Dark Side Of Nature (@Darksidevid) October 30, 2020
now I ain't no herpetologist, but I have a pretty damn good knowledge of snakes, and I know anacondas don't get anywhere near this length.
Also, this is a doctored version of this video:https://t.co/S1s3qn79jj — Quaternary Quester (AGKISTRODON STAN ACCOUNT) (@PrimordialProse) October 30, 2020
हे वाचा-हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी तरुणाच्या हातात दिलं 2 मीटर लांबीचं चालान
हा साप नदीत नसून रस्ता पार करत आहे आणि या व्हिडीओला इफेक्ट देण्यात आल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे. सापाला मोठं दाखवण्यासाठी या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. इतकच नाही तर हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.