हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी तरुणाच्या हातात दिलं 2 मीटर लांबीचं चालान; दंडाची रक्कम पाहून बसला धक्का

हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी तरुणाच्या हातात दिलं 2 मीटर लांबीचं चालान; दंडाची रक्कम पाहून बसला धक्का

दंडाची रक्कम स्कूटरच्या किमतीच्या दुप्पट असल्याचे तरुणाने सांगितले.

  • Share this:

बंगळुरु, 31 ऑक्टोबर : कर्नाटकाची (karnataka) राजधानी बंगळुरूमध्ये एका भाजी विक्रेत्याला विनाहेल्मेट स्कूटर चालविणं महागात पडलं आहे. तो विमाहेल्मेट स्कूटरवरुन जात असताना एका वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं व हेल्मेट न घातल्याचा दंड घेतला. मात्र त्याच्या स्कूटरच्या किमतीपेक्षा दुप्पट चलान भरावे लागल्याने सध्या या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. नियमांचं उल्लंघन करणं या व्यक्तीला खऱ्या अर्थाने महागात पडलं आहे.

तरुणाला दिलं दोन मीटर लांब चालान

मडीवाला येथे राहणाऱ्या अरुण कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारी त्यांना वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्यानं अडवलं. मात्र तरुणाचं डोकं चालणं थांबलं जेव्हा त्याने दोन मीटर लांबीचं चलान पाहिलं. ही संपूर्ण रक्कम 42,500 रुपये आहे. अरुण सांगतात हा दंड त्याच्या सेकंड हँड स्कूटीपेक्षाही जास्त आहे.

पोलिसांनी स्कूटर केली जप्त

तर मदीवाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण कुमारने 77 वेळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. ज्यासाठी आता त्याला तुरुंगात 42,500 रुपये द्यावे लागतील. पोलिसांनी त्याची स्कूटर जप्त केली आहे. विभागाकडून ही माहिती मिळाल्यानंतर अरुण कुमार पैशांची व्यवस्था करण्यासाठी आणि कोर्टात पैसे भरण्यासाठी काही अवधी मागितला आहे.

हे ही वाचा-पत्नीने मागितला आई होण्याचा अधिकार, पती म्हणतो माझ्या देखभालीचा खर्च दे

सध्या देशभरात वाहतुकीचे नियम अधिक कडक केले जात आहे. तो न भरल्यास कारवाईही केली जात आहे. त्यात या तरुणाला चक्क 42500 रुपयांचा दंड भरावा लागत आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. हा तरुण भाजी विकतो. त्यात आता इतकी मोठी रक्कम उभी कशी करायची हा त्याच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. ही बातमी वाचून अनेकजण हैराण झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: October 31, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading