जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका

जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका

जगप्रसिद्ध Harley-Davidson ने भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : जगभरात प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील Harley-Davidson बाईक कंपनी भारतातून बाहेर झाली आहे. या कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. भारतात या बाईकची निर्मिती आणि विक्री थांबवणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. भारतात तोटा सहन करावा लागत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

क्रूझर बाइक बनवणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनची बाईक जेव्हा भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आली, तेव्हा खूप उत्साह आणि अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे ही बाईक भारतात जादू दाखवू शकली नाही. मात्र हळूहळू त्याची विक्री मंदावत गेली.

2018 साली  3,413 बाईक विकल्या गेल्या. 2019 साली फक्त 2676 युनिट्सची विक्री झाली. तब्बल 22 टक्क्यांनी विक्री घटली.  तर 2019-20 या आर्थिक वर्षात 2,500 पेक्षाही कमी बाईक विकल्या गेल्या.

हे वाचा - मारूती देत आहे 4 फेव्हरेट गाड्यांवर तब्बल 50 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या एकदा

त्यानंतर आता कोरोना महासाथीत तर विक्रीवर  अधिकच परिणाम झाला. या बाईकची मागणी खूपच कमी झाली. यादरम्यानची स्थिती पाहता कंपनीने भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्येच कंपनीने हालचाल सुरू केली होती आणि आता अखेर कंपनीने आपला निर्णय जाहीर केला आहे. हार्ले डेव्हिडसन भारतात बंद झाल्याने आता या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. हरयाणातील बवालमध्ये या कंपनीचं अॅस्मेबली युनिट आहे. जवळपास 70 कर्मचारी आता बेरोजगार होतील.

हे वाचा - केवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर

ज्या देशांमध्ये अपेक्षेप्रमाणे नफा होत नाही आहे, तिथून बाहेर पडून महत्त्वाच्या बाजारावरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय कंनीने घेतला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 24, 2020, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading