जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : समुद्र किनारी बिकीनी घालून योगा करीत होती तरुणी; अचानक भल्या मोठ्या पालीने केला हल्ला!

Viral Video : समुद्र किनारी बिकीनी घालून योगा करीत होती तरुणी; अचानक भल्या मोठ्या पालीने केला हल्ला!

Viral Video : समुद्र किनारी बिकीनी घालून योगा करीत होती तरुणी; अचानक भल्या मोठ्या पालीने केला हल्ला!

गेल्या काही दिवसात ट्विटरवर एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहून कोणतीही व्यक्ती हैराण होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल होत (Viral Video) असतात. हे व्हिडीओ पाहून भीतीचं वातावरण तयार होतं. गेल्या काही दिवसात ट्विटरवर एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहून कोणतीही व्यक्ती हैराण होईल. या व्हिडीओमध्ये एक महिला समुद्र किनाऱ्यावर बिकीनी घालून योगा (Woman Doing Yoga in Bikini on Beach) करीत होती. अचानक तिच्यावर एका मोठी पालीने (Lizard) हल्ला केला. इतकच नाही तर पालीने तिचा चावा घेतला. (Big Lizard Bite Woman Doing Yoga on Beach) ट्विटरवर ‘बहामाहूपयोगी’ नावाच्या एका ट्विटर युजर आहे. या घटनेनंतर नाव बदलून ‘द इगुआना गर्ल’ (The Iguana Girl) असं ठेवलं आहे. कारण या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 21 ऑगस्ट रोजी या ट्वीटर युजरने आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात ती बिकिनी (Bikini) घालून समुद्राच्या किनाऱ्यावर योगा करीत (Yoga) होती. व्हिडीओमध्ये समुद्र किनारी महिली योगा करीत असताना दिसत आहे. महिला योगा करण्यात दंग असताना अचानक एक इगुआना (Iguana) तेथे येते आणि तिच्या दिशेने पुढे जाते. आणि अचानक महिलेच्या हाताला चावते. त्यानंतर महिला वेदनेने कळवळते. महिला तेथेच आरडोओरडा सुरू करते. त्यानंतर इगुआना मात्र तेथून पळून जाते.

जाहिरात

हे ही वाचा- मस्करीत तिनं युवकाची जीभ ओढली पण ती निघून थेट हातातच आली; Video पाहून व्हाल शॉक ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हि़डीओ आतापर्यंत 35 लाख हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये तब्बल 26 हजार लोकांना रिट्विट केला आहे आणि 2 लाखांच्या जवळपास लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. हजारो लोक या व्हिडीओवर कमेंट करीत आहेत. व्हिडीओ पाहून प्रत्येक व्यक्तीने चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मीडियावरदेखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महिलेने कमेंट करून सांगितलं की, ती वर्च्युअल योगा क्लासेस घेते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात