मराठी बातम्या /बातम्या /Viral /'शेकडो बाटल्या आणि 800 तासांहून अधिक मेहनत'; मारिया शारापोव्हाच्या अनोख्या ड्रेसचं रहस्य

'शेकडो बाटल्या आणि 800 तासांहून अधिक मेहनत'; मारिया शारापोव्हाच्या अनोख्या ड्रेसचं रहस्य

 एके काळी टेनिस  (Tennis)  कोर्टवर आपला जलवा दाखवणारी मारिया शारापोव्हा  (Maria Sharapova)  आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवते. टेनिसच्या कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवणारी मारिया 2020मध्ये निवृत्त झाली. तेव्हापासून ती टेनिसपासून दूर आहे; मात्र चॅरिटी शोज, फंड रेझिंगसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ही रशियन सुंदरी अधूनमधून माध्यमांसमोर येत असते.

पुढे वाचा ...

     मुंबई, 2 डिसेंबर-  एके काळी टेनिस  (Tennis)  कोर्टवर आपला जलवा दाखवणारी मारिया शारापोव्हा  (Maria Sharapova)  आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवते. टेनिसच्या कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवणारी मारिया 2020मध्ये निवृत्त झाली. तेव्हापासून ती टेनिसपासून दूर आहे; मात्र चॅरिटी शोज, फंड रेझिंगसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ही रशियन सुंदरी अधूनमधून माध्यमांसमोर येत असते. सामाजिक कार्यासोबतच मारिया पर्यावरणाबद्दलदेखील जागरूक आहे. जागतिक हवामानबदलाचा (Climate change) विचार करून ती सध्या जास्तीतजास्त पर्यावरणपूरक (Eco-friendly) गोष्टी वापरण्यावर भर देत आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मारियानं एक आकर्षक इको-फ्रेंडली ड्रेस (Eco-friendly Dress) घालून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

    काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये ब्रिटिश फॅशन कौन्सिल अॅवॉर्ड्स (British Fashion Council Awards) पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतल्या सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. टेनिसस्टार मारिया शारापोव्हादेखील याठिकाणी उपस्थित होती. आयरिस व्हॅन हर्पेननं (Iris van Herpen) तयार केलेला ड्रेस तिनं घातला होता. आपल्या आकर्षक ड्रेसमुळे या अॅवॉर्ड शोमध्ये मारियानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मारियानं घातलेला ड्रेस असामान्यच होता. आपल्या इको-फ्रेंडली ड्रेसबद्दल तिनं स्वत: इन्स्टाग्रामवर माहिती दिली. मारियानं एक फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये ड्रेसचे डिटेल्स शेअर केले होते. 'शेकडो बाटल्या रिसायकल (Recycled bottles) करून बनवलेल्या फॅब्रिकचा (Fabric) वापर करून फॅशन डिझायनर आयरिस हर्पेन आणि तिच्या टीमने हा खास ड्रेस तयार केला आहे. त्यासाठी त्यांना 800 हून अधिक तास मेहनत घ्यावी लागली. कठोर परिश्रमांना मूर्त रूपात पाहणं खरंच अविश्वसनीय आहे!!,' अशी कॅप्शन मारियानं आपल्या फोटोला दिली होती.

    मारियानं घातलेल्या ड्रेसचा फोटो फॅशन डिझायनर आयरिस व्हॅन हर्पेननंसुद्धा शेअर केला आहे. 'ब्रिटिश फॅशन अॅवॉर्ड्समध्ये मारिया IVH अपसायकल कस्टम लूकमध्ये दिसली. तिच्या या ड्रेसमध्ये 72 टक्के रिसाकल्ड इव्हियन प्लास्टिक बाटल्या आणि 28 टक्के अपसायकल्ड ऑरगॅनिक रेशीम वापरण्यात आलं आहे, अशी माहिती आयरिसनं दिली. नावीन्यपूर्ण अपसायकल्ड मटेरियल विकसित करून, आम्ही सकारात्मक बदलासाठी प्रेरणा देण्याचा आणि सर्जनशीलतेचा स्रोत होण्याचा प्रयत्न केला आहे, असं देखील आयरिस म्हणाली.

    (हे वाचा:Happy कपलची गोष्ट! 36 वर्षांचा वर, 82 वर्षांची नववधू; दोघांमधलं अंतर 45 वर्ष )

    डच डिझायनर (Dutch designer) आयरिस कायम तिच्या अनोख्या डिझाइन्ससाठी ओळखली जाते. गेल्या काही काळापासून तिने मोठ्या प्रमाणात टिकाऊ (sustainable) आणि पर्यावरणसुसंगत डिझाइन्स तयार केली आहेत. शारापोव्हाचा ड्रेसदेखील अशाच प्रकारचा होता. ओशिअॅनिक थीमवर तयार करण्यात आलेला हा ड्रेस रिफ्लेक्टिव्ह लेसर-कट पाकळ्यांनी (reflective laser-cut petals) आच्छादलेला होता. गोसमर लाइट सिल्कवर या पाकळ्या लावण्यात आल्या होत्या.सध्या हवामानबदल ही एक मोठी जागतिक समस्या झालेली आहे. जगभरातल्या प्रत्येक क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे. अगदी फॅशन वर्ल्डदेखील (fashion world) यापासून दूर राहिलेलं नाही. पर्यावरणाची काळजी असलेले अनेक सेलेब्रिटी आणि फॅशन आयकॉन्स आता जाणीवपूर्वक इको-फ्रेंडली कपडे निवडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशांच्या यादीमध्ये टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हाचा समावेश झाला आहे.

    First published:

    Tags: Viral