मुरादाबाद, 04 फेब्रुवारी : गाडी चालवताना स्टंटबाजी करणं अनेकांना महागात पडलं आहे. स्टंटबाजीमुळे अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा स्टंटबाजांना लगाम घालण्याची मागणी पोलिसांकडे सातत्यानं करण्यात येत असते. पोलिससुद्धा स्टंटबाजांची ओळख पटल्यावर त्यांना पोलिशी खाक्या दाखवतात. पण उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये सध्या कार आणि बाईकवर स्टंटबाजी करण्याचे प्रकार सातत्यानं समोर येऊ लागलेत.
विशेष म्हणजे त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुरादाबादमध्ये अशा स्टंटबाजांना कायदा व पोलिसांचा धाक राहिला नाही का? त्यांच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईची भीती राहिली नाही का? असे प्रश्न निर्माण झालेत.
हे ही वाचा : Video : सापाला शिकार बनवणं सिंहाला पडलं महागात, फणा काढला आणि...
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये चालत्या कार आणि बाईकवर स्टंटबाजी करून व्हिडिओ तयार केले जात आहेत. मुरादाबादमधील कटघर भागातून असाच एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये काही तरुण चालत्या जीप, कारच्या खिडक्यांमधून डोकं बाहेर काढून स्टंटबाजी करताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये तरुण गोंधळ घालताना आणि आरडाओरडा करताना गाडी चालवत असल्याचं दिसत आहे. शहरातील वातावरण, कायदा व सुव्यवस्था बिघवडण्याचा प्रयत्न या तरुणांकडून केला जातोय. त्यामुळे त्यांच्या या कृतीतून संबंधितांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं स्पष्ट झालंय.
गाडी चालतवाना स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच, त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक हेमराज मीना यांनी सांगितलं की, ‘रेल्वे अंडर ब्रिजखालून गाडी घेऊन येत असताना काहीजण स्टंटबाजी करत असल्याची माहिती मिळाली आहे. जीप, कार चालवताना स्टंटबाजी केली जात असून, हे तरुण वाहतूक नियमांचं उल्लंघन करत आहेत.
हे ही वाचा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video
चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे गाडी चालवणाऱ्याचा जीव धोक्यात येतोच. पण रस्त्यावरील इतर वाहनचालकांचासुद्धा जीव धोक्यात येतोय. या स्टंटबाज तरुणांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द केला जाईल. तसंच, त्यांची वाहनंही जप्त करण्यात येतील.’
पोलिसांची जनजागृती मोहीम
मुरादाबाद येथे वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी पोलिसांकडून सातत्यानं जनजागृती करण्यात येतेय. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक केलं जात आहे. कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय. मात्र, तरीही मुरादाबादमध्ये स्टंटबाजीच्या घटना थांबत नाहीत. या पूर्वीही अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Stunt video, Up Police, Uttar pradesh