जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाबाचं प्रेम! पावसापासून मुलाला असं वाचवलं, व्हायरल फोटो पाहून व्हाल भावुक

बाबाचं प्रेम! पावसापासून मुलाला असं वाचवलं, व्हायरल फोटो पाहून व्हाल भावुक

बाबाचं प्रेम! पावसापासून मुलाला असं वाचवलं, व्हायरल फोटो पाहून व्हाल भावुक

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक माणूस बाइक चालवताना आपल्या मुलाला जॅकेटच्या साह्याने पावसापासून वाचवताना दिसत आहे. मुसळधार पावसात ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट पाहत असताना ते मूल वडिलांच्या जॅकेटच्या आत शिरलं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 डिसेंबर : पालक आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी मेहनत घेतात. आपल्या समाजात आईचं प्रेम, ममता याबद्दल खूप बोललं जातं; पण त्या तुलनेत वडिलांच्या प्रेमाबद्दल बोललं जात नाही. याचा अर्थ वडील मुलांची काळजी घेत नाहीत, असा होत नाही; पण प्रेम आणि जिव्हाळ्याचा विषय आला, की कायम प्रत्येकाला आईच आठवते. हल्ली सोशल मीडियावर खूप फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आईच्या प्रेमाइतकंच वडिलांचंही मुलांवर प्रेम असतं, हे दर्शवणारे अनेक फोटो किंवा छोटे व्हिडिओ अलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. डॉ. अजयिता नावाच्या युझरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत. या संदर्भातलं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे. हेही वाचा :  VIDEO - 20 रुपयांसाठी दिला लाखमोलाचा जीव; भरधाव ट्रेनसमोर तरुणाने आयुष्याचा केला The End या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक माणूस बाइक चालवताना आपल्या मुलाला जॅकेटच्या साह्याने पावसापासून वाचवताना दिसत आहे. मुसळधार पावसात ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट पाहत असताना ते मूल वडिलांच्या जॅकेटच्या आत शिरलं. या वडिलांचं आपल्या मुलावरचं प्रेम पाहून तुम्हीही भावूक व्हाल, असा तो फोटो आहे. “आपल्या इथे बाबाला प्रेमाच्या बाबतीत कायम दुय्यम स्थान दिलं जातं!” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

    जाहिरात

    हा फोटो भावूक करणारा आहेच; पण फोटोची कॅप्शन खूप विचार करायला लावणारे आहे. आपल्या इथे प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा विषय येतो, तेव्हा आईला कायम पहिलं स्थान मिळतं आणि बाबाला दुय्यम स्थान असतं. म्हणून हा फोटो पाहिल्यावर मनाला भिडतो. हेही वाचा :  VIDEO - भरधाव ट्रकला ‘लटकला’ बाईकस्वार; ड्रायव्हिंग करताना फास लागला अन्… दरम्यान, या फोटोवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. “वडील छत्रीसारखे असतात; ते सर्व संकटांपासून तुमचं रक्षण करतात. ते म्हातारे झाले तरीही. मी माझ्या वडिलांना 4 वर्षांपूर्वी गमावले. असा एकही दिवस नाही की मला त्यांची आठवण झाली नाही. ते नसल्याने माझ्यात बळ नसल्याचं मला जाणवतं,” असं एका युझरने म्हटलं आहे. “वडिलांनी केलेलं बलिदान मोजलं जात नाही… 10 वर्षांच्या मुलाचा बाप असल्याने मी या फोटोशी स्वतःला जोडू शकतो,” असं दुसऱ्या एक युझरने म्हटलंय. “हे खरंच मनाला स्पर्श करणारं आहे. एकदा मला आठवतंय, की खूप मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस अचानक आल्याने आमच्याकडे छत्री नव्हती. त्यामुळे मी माझं हेल्मेट माझ्या मुलीच्या डोक्यावर धरलं होतं, जेणेकरून तिचं पावसापासून रक्षण व्हावं,” असं आणखी एका युझरने कमेंटमध्ये लिहिलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात